‘बिग बी’ अमिताभच्या ‘डॉन’ला 42 वर्षे पूर्ण ! मिळाला होता ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ अवॉर्ड

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमात काम केलं आहे ज्यापैकी खूप सिनेमे सुपरहिट झाले आहेत. अमिताभ यांच्या डॉन या सिनेमाला आज 42 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमात त्यांनी डबल रोल साकारला होता. या सिनेमासाठी त्यांनी फिल्मफेअर बेस्ट अ‍ॅक्टरचा अवॉर्ड मिळाला होता. बिग बींनी सिनेमाची आठवण काढत आता एक जुना फोटो शेअर केला आहे.

फोटो शेअर करताना बिग बी म्हणतात, “डॉनला पूर्ण झाली 42 वर्षे. नूतन जी सोबत डॉन साठी बेस्ट अ‍ॅक्टर फिल्मफेअर. नरिमन इराणीनं सिनेमा प्रोड्युस केला होता. एका अपघातात त्यांचं निधन झालं. मी हा अवॉर्ड त्यांच्या पत्नीला डेडीकेट केला होता त्यांना स्टेजवर बोलवून.”

अनेकांना माहिती नसेल त्याचवर्षी मैं तुलसी तेरे आंगन की साठी नूतन यांना बेस्ट अ‍ॅक्ट्रेस फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.

डॉन सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा चंद्र भरोटनं डायरेक्ट केला होता. हा सिनेमा 12 मे 1978 रोजी रिलीज झाला होता. ये है बम्बई नगरिया हे गाणं गेट वे ऑफ इंडियावर शुट करण्यात आलं होतं.

डॉन सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत जीनत अमान, प्राण, हेलन, ओम शिवपुरी, युसूफ खान, पिंचू कपूर, इफ्तेखार, मॅक मोहन प्रमुख भूमिकेत होते.