Big Boss | सलमान खान कतरिना कैफच्या तालावर नाचला, काय आहे नेमके प्रकरण?

पोलीसनामा ऑनलाईन : सलमान खानला (Salman Khan) काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता. त्यातून बरे झाल्यानंतर तो आता पुन्हा एकदा बिग बॉसचा (Big Boss) शो होस्ट करताना दिसणार आहे. मागच्या विकेंडला सलमान खानने होस्ट केले. यावेळी सलमानने सुंबुल, अंकित आणि गौतमचा जोरदार क्लास घेतला. सुंबुलवर तर सलमान खानचा पाराच चढला. सुंबुल तिच्या वडिलांचे काही ऐकत नाही तर आपले काय ऐकणार असे देखील सलमान खान यावेळी म्हणाला. यावेळी कतरीना कैफ (Katrina Kaif) बिग बॉसच्या (Big Boss) मंचावर तिच्या आगामी भूत (Bhoot Movie) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे.

बिग बॉसच्या मंचावरील सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान कतरिनाच्या तालावर नाचताना दिसत आहे. हे दोघे टिप टिप बरसा पानी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. सलमान खान आणि कतरिना यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडली आहे.

ही जोडी टायगर 3 (Tiger 3 Movie) या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याने चाहते गेल्या अनेक वर्षांपासून या
चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. सलमान आणि कतरिनाचा हा डान्स त्यांच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात
आवडला आहे. बिग बिग बॉसच्या घराचा कॅप्टन होण्यासाठी आता सलमान खान घरातील सदस्यांना एक टास्क देतो,
ज्यावरून घरात आता जोरदार हंगामा पाहायला मिळणार आहे.

Web Title :-  Big Boss | salman khan and katrina kaif dance video viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gulabrao Patil | कोणीही बिकाऊ नाही, राणांनी आपले शब्द मागे घेतले पाहिजेत – गुलाबराव पाटील

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खोकेवाले आमदार म्हणतात हे दु:ख, काही आमदारांनी मला फोन करून…’