मोठा खुलासा : गृहमंत्री अमित शाह यांची उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंबाबत ‘तक्रार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिमंडळामध्ये सिहाचा वाट उचलणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याविषयी तक्रार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. गृहमंत्री अमित शहा रविवार व्यंकय्या नायडू यांच्या ‘लिस्निंग, लर्निंग एंड लीडिंग’ या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी एका कार्यक्रमासाठी गेले असता यावेळी अमित शहा यांनी ही बाब बोलल्याचे समोर आले आहे.

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, मला व्यंकय्या नायडू यांच्याविषयी एक तक्रार आहे की ते सत्ताधारी पक्षातील लोकांशी जरा जास्तच कठोरतेने वागतात त्यामुळे प्रत्येक मंत्री राज्यसभेत त्यांना घाबरून असतो. या कार्यक्रमासाठी अभिनेते रजनीकांत सुद्धा उपस्थित होते आणि रजनीकांत यांनी अमित शहा आणि मोदी सरकारचे चांगलेच कौतुक यावेळी केले.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like