गुंड गजानन मारणे ‘रॉबिनहूड’ आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे यांची तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी समर्थकांबरोबर मिरवणूक आणि हुल्लडबाजी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहेत. याप्रकरणावरून गजानन मारणे रॉबिनहूड आहे का? असा उपरोधिक प्रश्न मुंबई हाय कोर्टाने मंगळवारी (दि.२३) केला आहे. तसेच तुरुंगातील बंदींना कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून कोर्ट पॅरोल देत आहे आणि तुम्ही मिरवणुका काढता, अशा कडकडीत शब्दात न्यायालयीन खंडपीठाने सुनावले आहे. तर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. याचिकेवर पुढील सुनावणी ५ एप्रिलला होणार आहे. असे कोर्टाने स्पस्ष्ट केले.

गजानन मारणे यांना तळोजा तुरुंगात गेले कित्येक वर्षे खुनाच्या प्रकरणात अटक केली होती. तर मागच्या महिन्यात त्याची निर्दोष सुटका झाल्याने. त्यावेळी तुरुंगाबाहेर मारणे यांचे अनेक समर्थ, कार्यकर्ते अधिक संख्येने गोळा झाले होते. त्यांनी मुंबई-पुणे प्रवासात हायवे रस्त्यावर सुमारे ३० मोटारींच्या ताफ्यासह मिरवणूक, घोषणाबाजी केली आणि टोलनाक्‍यावर जमाव करून गोंधळ घेतला होता. याप्रकारावर टीका झाल्यावर पोलिसांनी आठ तक्रारी दाखल करून घेतल्या. केल्या. त्यानंतर तक्रारी रद्द करण्यासाठी गजानन मारणेने मुंबई हाय कोर्टात आपली याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, गुंड गजानन उर्फ गजा मारणेच्या मिरवणुकीप्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिकांना अटक केली आहे. तसेच सुमारे तीसहून अधिक आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहे. तर गजा मारणेच्या मिरवणुकीचा व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारित झाला होता. त्यामुळे नवी मुंबई, रायगड, पिंपरी-चिंचवड आणि पुणे या मार्गाने प्रवास करणाऱ्या मारणेच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच मिरवणुकीनंतर या प्रकारावरून पुणे पोलिसांनी गजा मारणेला साताऱ्यात ताब्यात घेतले. आणि महाराष्ट्र धोकादायक उपक्रम अधिनियम (MPDA) अंतर्गत मारणेची पुणे येरवडा मध्यवर्ती कारागृहात गजानन मारणे यांची रवानगी करण्यात आली.