धक्कादायक खुलासा ! ‘बिग बॉस 13’च्या ‘या’ स्पर्धकावर ‘सनी लिओनी’नं केला होता छेडछाडीचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस सीजन 13 चा एक स्पर्धक खूप चर्चेत येताना दिसत आहे. याचं नाव आहे पारस छाबडा. पारस शोदरम्यान जास्त करून मुलींसोबत वेळ घालवताना दिसतो. पारसवरून शहनाज कौर गिल आणि माहिरा शर्माचंही भांडण झालं आहे. अशातच आता असे समजत आहे की, बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनीने पारसवर छेडछाडीचा आरोप केला आहे. एका वेबसाईटने आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा केला आहे.

समोर आलेल्या एका वृ्त्तात पारस छाबडावर छेडछाडीचा आरोप सनी लिओनीने स्प्लिट्सविला दरम्यान केला होता. पारस सनीच्या शुटींगच्या तिकडेच असायचा. तो सनीवर लाईन मारत होता. जेव्हा पारसने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा सनीने त्याची तक्रार निर्मात्याकडे केली होती.

जेव्हा पती डॅनियलला याबाबत माहिती मिळाली तेव्हा तो तिच्यासोबत शुटींगला जाऊ येऊ लागला. डॅनियलमुळे कोणाचीही सनीसोबत बोलण्याची हिंमत होत नव्हती. तरीही पारस ऐकत नव्हता. सनीने स्प्लिट्सव्हिलाच्या मेकर्सना विनंती केली होती त्यांनी पारसला पुन्हा बोलवू नये.

बिग बॉसच्या घरात पारसला दिल फेक म्हटलं जातं. यावेळी घरातून बाहेर काढण्यासाठी पारस व्यतिरीक्त सिद्धार्थ डे, अबु मलिक, असीम रियाज नॉमिनेटेड आहे. मुलींमध्ये रश्मी देसाई आणि माहिरा शर्मा आहे. या आठवड्यात एक मुलगा आणि एक मुलगी बिग बॉसच्या घरातून बाहेर होणार आहे.

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like