काय सांगता ! होय, शिल्पा शेट्टीनं ‘भाईजान’ ला विचारला ‘हा’ प्रश्न, ‘रडू’ कोसळलं सलमान खानला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न सर्व चाहते फार वर्षांपासून ऐकत आहेत. परंतु या प्रश्नाला सलमान नेहमी हटके उत्तर देत असतो. अशात बिग बॉसच्या मंचावर पुन्हा एकदा सलमान खानला लग्नाबाबत प्रश्न विचारले जाणार आहेत आणि हे प्रश्न अभिनेत्री शिल्पा शेट्टी करणार आहे.

बिग बॉसचा नवा टीझर समोर आला असून, सलमान खान त्याच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचे गाणे ‘तडप तड़प के इस दिल से’ हे गाणे म्हणत होता, तेव्हा शिल्पा ने सलमानला सांगितले की लग्न करून पहा म्हणजे कळेल की ‘असली तडपना क्या होता है’ हे ऐकून सलमान रडू लागला.

हा व्हिडीओ खूप मजेशीर असून यात सलमान आणि शिल्पा खूप मस्ती करताना दिसत आहेत. खरं तर शिल्पा शेट्टी आपल्या ‘निकम्मा’ या फिल्मच्या प्रमोशन साठी बिग बॉस १३ मध्ये आली होती.

या वेळी त्यांचे को – स्टार अभिमन्यू दसानी आणि सिंगर शर्ली सेतिया देखील त्यांच्या सोबत उपस्थित होत्या. या दोघांनीही सलमान खानसोबत मस्ती केली आणि गाणी देखील म्हटली. विशेष म्हणजे बिग बॉसच्या सुरूवातीला शिल्पा शेट्टीने देखील हा शो होस्ट केला होता. शिल्पाने बिग बॉसच्या सीझन २ ला होस्ट केले होते.

शिल्पाच्या करिअरबद्दल विचार केला तर ती तब्बल १३ वर्षानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करीत आहेत. ती ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शब्बीर खान हे करत आहेत.