Bigg Boss 14 : ‘ड्रामा क्वीन’ राखीसोबत झाली फसवणूक, ‘ढसा-ढसा’ रडत म्हणाली – ‘पती विवाहित असून त्याला मुलगाही आहे’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. घरात आल्यापासून ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना काही कराणानं चर्चेत येत आहे. अनेकदा राखी अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) वरील तिचं प्रेम व्यक्त करताना दिसली आहे. राखीला अनिभव आणि घरातील इतरीह लोक खूप वैतागले आहेत. खास करून अभिनवची पत्नी रूबीना दिलैक जास्त वैतागलेली दिसत आहे. इतकंच नाही तर राखीनं तिच्या लग्नाबद्दल आणि पती बद्दलही अनेकदा भाष्य केलं आहे. आता तिनं असा खुलासा केला आहे की, पतीनं तिला धोका दिला आहे.

एक प्रोमो समोर आला आहे. यात राखीनं सांगितलं की, तिचा पती रितेश यानं तिला धोका दिला आहे. रितेश आधीच विवाहित आहे. प्रोमोत दिसत आहे की, राखी व्हिडीओत रडत आहे. रडता रडता ती सांगत आहे की, तिचा पती विवाहित आहे. त्यानं मला सांगितलं नव्हतं. मी किती त्रास सहन करू. त्याला एक मुलगाही आहे. मला तर मुलगाही नाही.

राखी देवोलिनाला सांगते की, मी काही नाही करू शकत. माझं लग्न लीगल नाहीये. मला मुलगा पाहिजे.

राखीनं याआधीही शोमध्ये सांगितलं आहे की, तिचा पती लग्नानंतर लगेच तिला सोडून गेला होता. तो एकदाही परत आला नाही. रितेशनं तिला 5 वेळा घटस्फोटाची धमकीही दिली आहे.