Bigg Boss : सोनाली फोगाटच्या धमक्यांनी भडकला ‘भाईजान’ सलमान, म्हणाला – ‘काय करणार तू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात स्पर्धकांचं खुलेआम धमकी देणं आता कॉमन झालं आहे. आधी जे कविता कौशिक (Kavita Kaushik) करताना दिसत होती, तेच आता सोनाली फोगाट (Sonali Phogat) देखील करत आहे.

रूबीना सोबत झालेल्या भांडणादरम्यान सोनाली फोगाट अनेकदा असं म्हणाली आहे की, तिची माणसं बाहेर पाहून घेतील. सोनालीच्या या धमक्या निक्की तंबोली सोबतही सुरूच होत्या. यामुळं घरात खूपच गोंधळ दिसून आला.

आता वीकेंड वॉरमध्ये सलमान खाननं हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यानं सोनालीला झापलं आणि वॉर्निंग दिली की, तिनं कुणालाही कोणत्याही अंदाजात कधीही धमकी देऊ शकत नाही.

सध्या वीकेंड वॉरचा एक प्रोमो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. यात सलमान खान, सोनाली फोगाटवर खूप नाराज दिसत आहे. तो तिला सतत विचारत आहे की, ती काय करेल.

जेव्हा निक्कीनं सलमान खानला सांगितलं की, सोनाली खूप सदस्यांना धमकी दिली आहे, यावर सलमान म्हणतो, आज तू सागून टाक, काय करणार आहेस. काय करू शकतेस ?

परंतु सोनाली हे आरोप खोटे असल्याचं सांगत हे मान्यच करत नाही. ती सलमानलाही फुटेज पाहायला सांगते. परंतु सोनालीचा हा अंदाज पुन्हा सलमानला राग आणून देतो.

तो स्पष्ट सांगतो की, सोनालीनं खुलेआम धमकी दिली आहे आणि तिच्या मानण्यानं किंवा न मानण्यानं काहीही फरक पडत नाही. सलमान असंही म्हणतो की, सोनालीची मुलगीही हा शो पहात आहे, अशात हे सर्व करणं ठिक नाही.

तसं तर प्रोमोमध्ये सलमान खान पहिल्यांदाच रूबीनाचं समर्थन करताना दिसला. एकीकडे त्यानं सोनालीसोबतच्या भांडणात तिला सपोर्ट केला आणि दुसरीकडे अभिनववर नाराजीही व्यक्त केली की, तो कठिण काळात तिच्या सोबत उभा राहिला नाही.