‘नागिन 4’ मधील रश्मी देसाईचा फर्स्ट लुक व्हायरल, ‘या’ दिवशी करणार शोमध्ये ‘एन्ट्री’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एकता कपूरचा सुपरनॅचरल शो नागिन 4 चाहत्यांमध्ये हिट होत आहे. शोमध्ये अनेक ट्विस्ट येताना दिसत आहेत. अनेक नवीन कलाकारही शोला जोडले जात आहेत. असेही रिपोर्ट समोर आले होते की, बिग बॉस 13 ची स्पर्धक रश्मी देसाई नागिन 4 मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. यानंतर आता रश्मी देसाईचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर लीक झाला आहे.

रश्मी देसाईच्या कास्टींगबद्दल शोच्या मेकर्सनं अद्याप काहीही प्रतिक्रिया किंवा कोणतही वक्तव्य केलेलं नाही. परंतु सोशल मीडियावर रश्मीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत असा दावा केला जात आहे की हा BTS व्हिडीओ नागिन 4 च्या शुटींगदरम्यानचा आहे. रश्मीनं शोची शुटींग सुरू केली आहे. ही होळी सिक्वेंसची शुटींग आहे. यात रश्मी देसाई बा सोबत दिसत आहे. या वरून हे स्पष्ट आहे की, होळीच्या सिक्वेंसवेळी रश्मी शोमध्ये एन्ट्री करणार आहे.

नागिन 4 मधील रश्मी देसाई फर्स्ट लुक समोर आल्यानंतर आता चाहत्यांमधील एक्साइटमेंट दुप्पट झाली आहे. असं म्हटलं जात आहे की, नागिम 4 मध्ये रश्मी देसाई नयनतारा (जास्मीन भसीन) हिला रिप्लेस करणार आहे. शोमध्ये रश्मी जास्मीच्या रोलमध्ये दिसणार आहे की दुसरा कोणता रोल साकारणार आहे यावर अद्याप सस्पेंस कायम आहे.