Bigg Boss OTT 2 | “मला सर्व दारुडी म्हणायचे”; अभिनेत्री पुजा भट्टने बिग बॉस ओटीटी 2 मध्ये व्यक्त केली मनातील खंत

पोलीसनामा ऑनलाइन – बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ऑनलाइन रियालिटी शो बिग बॉग ओटीटी सीजन 2 (Bigg Boss OTT 2) हा काल (दि.18) पासून सुरु झाला आहे. यंदा बॉलीवुडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) या सीजनचे सूत्रसंचालन करणार आहे. बिग बॉसमध्ये कोण सेलिब्रिटी स्पर्धेक म्हणून येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. शो सुरु झाल्यामुळे सिझनबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे.या दरम्यान अभिनेत्री पुजा भट्ट (Actress Pooja Bhatt) हिने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये नशेविषयी तिच्या बद्दल लोकांचे समज तिने दूर करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. (Bigg Boss OTT 2)

 

 

दिग्दर्शक महेश भट्ट (Director Mahesh Bhatt) यांची मुलगी आणि अभिनेत्री आलिया भट्टची (Actress Alia Bhatt) बहिणी अभिनेत्री पुजा भट्ट ही बिग बॉस ओटीटी सिझन 2 मध्ये दिसत आहे. याआधी अनेक वादग्रस्त विषयांमुळे चर्चेत असलेल्या पुजाने लोक तिला दारुडी (Alcoholic) समजत असल्याचे बोलून दाखवले. शोमध्ये साइरस ब्रोचा (Cyrus Broacha) आणि इतरांशी संवाद साधताना, स्पर्धक पूजा भट्टने अगदी वयाच्या 44 व्या वर्षी दारूच्या व्यसनावर मात केल्याचे जाहीर केले. पूजाने शोमध्ये कबूल केले की, ‘ दारू पिण्याची मला सवय होती आणि म्हणूनच मी सर्वांसमोर ते कबूल केले आणि त्याच वेळी माझे व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला.’ आपल्या भारतीय समाजात दारूचे व्यसन असलेल्या महिलांकडे चुकीच्या नजरेने बघितले जाते, असेही ती यावेळी म्हणाली.

 

पुढे ती म्हणाली की, “समाजाकडून पुरुषांना व्यसने करण्याचा परवाना मिळतो, त्यामुळे ते जाहीरपणे अंमली पदार्थांचे व्यसन (Drug Addiction) आणि दारूपासून मुक्त होण्याबद्दल बोलू शकतात. मात्र, महिला खुलेआम दारू पीत नाहीत त्यामुळे त्या दारू सोडण्याबाबत उघडपणे बोलू शकत नाहीत. मी खुलेआम दारू प्यायचे त्यामुळे आता दारू सोडावी लागेल असे वाटले तेव्हा ते तरी मी का लपवू?’असे मला वाटले. मला एकांतात सावरायचे नव्हते. ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला माहित असावी.

 

 

मनातील खंत व्यक्त करत ती म्हणाली की, ‘लोक मला दारुडी म्हणायचे पण नंतर मी म्हणाले की मी सुधारत असलेली दारुडी आहे.’ स्पर्धकांशी बोलताना पूजाने तिच्या दारूच्या व्यसनाबद्दल आणि व्यसनमुक्तीबद्दल सांगितले आहे.

 

 

अतिशय लोकप्रिय असलेल्या बिग बॉस OTT 2 (Bigg Boss OTT 2) च्या प्रीमियर एपिसोडमध्ये दिबांग (Dibang),
अजय जडेजा (Ajay Jadeja), सनी लिओन (Sunny Leone), पूजा भट्ट, मुकेश छाबरा (Mukesh Chhabra)
आणि एमसी स्टॅन (MC Stan) यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती पॅनेलचे सदस्य म्हणून बसले होते.
अविनाश सचदेव (Avinash Sachdev), पलक पुरस्वानी (Avinash Sachdev),
बबिका धुर्वे (Babika Dhurve), जिया शंकर (Jiya Shankar), आलिया सिद्दीकी (Alia Siddiqui),
फलक नाज (Falak Naaz), आकांक्षा पुरी (Akanksha Puri), जेडी हदीद (JD Hadid),
साइरस ब्रोचा (Cyrus Brocha), मनीषा राणी (Manisha Rani), अभिषेक मल्हान (Abhishek Malhan),
पुनित सुपरस्टार (Punit Superstar) आणि पूजा भट्ट हे 13 स्पर्धक यंदाचा सीझन गाजवणार आहे.
शोच्या प्रीमियरच्या पहिल्याच दिवशी पुनित सुपरस्टार मधून बाहेर काढलेला पहिला स्पर्धक ठरला आहे.

 

 

Web Title :  Bigg Boss OTT 2 | bigg boss ott 2 pooja bhatt share that she gave up alcohol at the age of 44

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा