Prasad Oak | अभिनेता प्रसाद ओकने प्रपोज करताना दिल्या मंजिरीला तीन अटी; पहिल्या प्रेमाची जागा देणार नसल्याचे सांगितले स्पष्टच, काय आहे किस्सा ?

पोलीसनामा ऑनलाइन – Prasad Oak | मराठी सिनेविश्वात एकामागून एक हिट चित्रपट देणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक (Actor Prasad Oak) हा लोकप्रिय कलाकार आहे. प्रसाद ओकने फक्त अभिनयच नाही तर दिग्दर्शन, निर्माता, गायक, लेखक, सुत्रसंचालक अशा नानाविध प्रकारच्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या निभावल्या आहेत. प्रसाद ओक अनेक वर्ष मराठी मनोरंजन श्रेत्रात कार्यरत असला तरी त्यांची आणि त्यांची पत्नी मंजिरी ओक (Manjiri Oak) यांची रियल लाईफ जोडी ही सध्या ट्रेडिंगमध्ये आली आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट करत असलेल्या या जोडीमध्ये सुरुवातीलाच काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या होत्या. प्रसादाने मंजिरीला पहिल्या प्रेमाची जागी देता येणार नाही असे सांगितले होते.

 

 

अभिनेता प्रसाद आणि मंजिरी ही आता प्रसिद्ध जोडी असून ते अनेकदा इंटरव्ह्यूमध्ये एकत्र दिसतात. प्रसाद आणि मंजिरी सोशल मीडियावर सक्रिय असून ते पती पत्नीच्या नात्यातील गमतीदार विषयांवर रिल्स शेअर करतात. त्यांची जोडी नेटकऱ्यांची पसंतीदार जोडी बनली आहे. तो दोघे ब्रॅन्डसाठी ब्रँड अॅम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणूनही काम करतात. मंजिरी आणि प्रसादचे लव्ह मॅरेज असून त्यांचा स्ट्रॉग बॉन्ड अनेकदा पाहायला मिळतो. मंजिरीने एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या लव्ह स्टोरीचे किस्से शेअर केले आहेत. प्रसाद मंजिरीवर मनापासून प्रेम करत असला तरी तो तिला पहिल्या प्रेमाच्या जागा कधी देऊ शकणार नाही असे त्याने मंजिरीला आधीच बजावले होते.

 

 

मंजिरी ओकने सांगितले की, “प्रसादने मला ज्यावेळी प्रपोज केले, तेव्हा त्याने मला तीन गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट त्याने सांगितली होती की, मला मस्का लावता येत नाही. दुसरी अशी की, मला बाबू-शोना असं प्रेमानं बोलता येत नाही आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, माझे क्षेत्र, ज्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे माझे पहिले प्रेम कायम माझे प्रोफेशन (Profession) राहणार आहे. म्हणून तू आधीच मनाची तयारी कर असं प्रसादने मला सांगितलं होतं. मात्र, वयाच्या 16 व्या वर्षी मी काय मनाची तयारी करणार असं म्हणत मंजिरीने प्रसादच्या पहिल्या प्रेमाच्या प्रपोजचा किस्सा शेअर केला आहे.

 

अभिनेता प्रसाद ओकने अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याने मालिकांमधून काम केले आहे, प्रसादने दोघात तिसरा आता सगळ विसरा, फूल 3 धमाल (Full 3 Dhamaal), हापुस (Hapus), नवरा अवली बायको लवली, 7 रोशन व्हिला असे चित्रपट आधी केले होते.
त्यानंतर त्यांची ‘डॉ.काशिनाथ घाणेकर’ चित्रपटातील (Dr. Kashinath Ghanekar Movie) नटश्रेष्ठ प्रभाकर,
‘फर्जंद’ (Farzand) चित्रपटातील बहिर्जी नाईक (Bahirji Naik),
धर्मवीर चित्रपटातील (Dharamveer Movie) आनंद दिघे (Anand Dighe)
या त्याच्या गाजलेल्या भूमिकांना प्रेक्षकानी डोक्यावर घेतले.
त्याने दिग्दर्शन क्षेत्रातही कामगिरी केली असून त्याने कच्चा लिंबू (Kaccha Limbu), हिरकणी (Hirakni),
चंद्रमुखी (Chandramukhi) या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमध्ये त्यांच्यासोबत भक्कम उभी राहिलेली
त्याची पत्नी मंजिरी (Prasad And Manjiri Oak) ही देखील आता लाईमलाईटमध्ये आली आहे.
सध्या ती चित्रपटांच्या सेटवर देखील त्याला मदत करताना पाहायला मिळते. ही जोडी प्रेक्षकांना देखील आवडत आहे.

 

 

Web Title :  Prasad Oak | prasad oak has love marriage with manjiri oak but still she has second place in his life

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा