बिहार : नीतीश कुमार 6 वेळा बनले मुख्यमंत्री, तरी देखील 16 वर्षात कशामुळं लढवली नाही निवडणुक ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारचे ज्येष्ठ पत्रकार अरुण पांडे म्हणतात की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नेहमीच विधानसभा निवडणुका लढविल्या पाहिजेत आणि जिंकून मुख्यमंत्री व्हावे.निवडणुका म्हणजे काय ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.तर हे नेत्याच्या कार्याचे जनतेने दिलेले म्हणजेच सार्वजनिक प्रतिबिंब आहे.जर नितीश चांगले काम करत असतील तर त्यांनी अवश्य निवडणुक लढली पाहिजे.

बिहारमध्ये निवडणूक उत्साह अतिशय वेगवान होत आहे.तर दुसरीकडे एनडीएने बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.मात्र, माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी एनडीएत प्रवेश घेतल्याने हे समीकरण बदलले आहे.परिस्थितीत नितीशकुमार आतापर्यंत ६ वेळा बिहारचे मुख्यमंत्री बनलेले नितीशकुमार यावेळी सुद्धा विजयासह ते पुन्हा मुख्यमंत्री होतील का? आणि जर नितीश 6 वेळा मुख्यमंत्री झाले असतील तर ते स्वत: विधानसभेची निवडणूक का लढत नाहीत?

गुड गव्हर्नन्स बाबू म्हणून प्रसिद्ध असलेल्या नितीशकुमार यांना बिहारमध्ये पर्याय आहे का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण मागील 15 वर्षांपासून नितीश सत्तेत आहेत.आणि ते जनता दल युनायटेड (जेडीयू) या पक्षाचे कट्टर म्हणून ओळखल्या जातात.या १५ वर्षात ते राज्यात विकासाचे प्रदर्शन असल्याचा दावा करतात आणि त्यांनी बिहारची प्रतिमाही बदलली आहे.

म्हणूनच नितीश यांनी आपल्या पहिल्या रॅलीत ‘निश्चय संवाद’ मध्ये आपल्या 15 वर्षांच्या कारकीर्दीत केलेली कामे मोजली.एवढेच नव्हे तर या वर्चुअल मेळाव्यात त्यांनी निवडणुकीचा अजेंडादेखील निश्चित केला.ज्या प्रकारे त्यांनी लालू-राबडी यांच्या कारभाराची कमतरता मोजली त्यावरून असेच वाटते कि त्यांचा मुख्य अजेंडा हा ‘१५ वर्षे नितीश विरुद्ध १५ वर्षे लालू-राबडी’ असा आहे.विकासाचा माणूस म्हणून आपली ओळख निर्माण करूनही नितीश यांनी राजकारणाची सुरुवात कशी केली आणि निवडणुका का लढत नाहीत, हे आपल्याला माहिती आहे.

नितीश कुमार मूळचे नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असून ते कुर्मी जातीचे आहेत.त्यांचे वडील कविराज रामलखन सिंह हे एक डॉक्टर होते. नितीश कुमार शिक्षणात चांगले होते आणि बिहार अभियांत्रिकी महाविद्यालयातून (आज ती एनआयटी पटना म्हणून ओळखली जाते) इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला

त्यांनी जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया आणि कर्पूरी ठाकूर या दिग्गज नेत्यांसह सुरुवातीचे राजकारण केले. त्यानंतर 1977 च्या जेपींच्या आंदोलनामध्ये नितीश कुमार यांनी सक्रिय भूमिका बजावली. राजदचे लालू यादव आणि नितीशचे समकालीन असलेले भाजपचे सुशील कुमार मोदी यांनीही त्याच वेळी जेपींच्या आंदोलनामध्ये उडी घेतली. नंतर नितीश 1977 मध्ये जनता पक्षात दाखल झाले.

१९८५ मध्ये निवडणुका जिंकून पहिल्यांदा बनले आमदार
१९८५ मध्ये नितीश यांनी हरनौत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. यापूर्वी त्यांना दोन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयानंतर नितीश यांनी राजकारणात वेगाने प्रगती केली. 1989 मध्ये नितीशकुमार जनता दलाचे सचिव म्हणून निवडले गेले. त्यानंतर १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बाढ़ या मतदारसंघातून उभे राहिले.नितीश कुमार यांनी ही निवडणूक जिंकली.

या विजयानंतर नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणाकडे म्हणजेच केंद्राच्या राजकारणाकडे वळले. नितीशकुमार यांनी १९९१, १९९६, १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुका देखील जिंकल्या. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते नंतर कृषिमंत्री होते आणि त्यानंतर १९९९ मध्ये काही काळ रेल्वेमंत्री म्हणून होते. १९९९ मध्ये पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघातात ३०० लोक ठार झाले त्यामुळे नितीश कुमार यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

१९९४ मध्ये समाजवादी चळवळीचे एक प्रमुख नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यासमवेत नितीशकुमार यांनी जनता दल बायांची साथ सोडली आणि समता पार्टीची स्थापना केली. त्यानंतर १९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. नंतर शरद यादव यांच्या नेतृत्वात जनता दल, समता पार्टी आणि लोकशक्ती पार्टी एकत्र झाली आणि २००३ मध्ये जनता दल युनायटेड पार्टी बनली.

२००० मध्ये प्रथमच बनले मुख्यमंत्री
२००० मध्ये नितीशकुमार बिहारचे फक्त 7 दिवसासाठी मुख्यमंत्री झाले. तथापि, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा पराभव झाल्यानंतर नितीश यांनी पुन्हा आपले लक्ष राज्याच्या राजकारणाकडे वळविले. त्यावेळी बिहारमधील राबड़ी राज्यात त्यांची लोकप्रियता झपाट्याने कमी होत होती. राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीचे वर्चस्व होते. अशा परिस्थितीत बिहारमधील लोक एका चांगल्या नेत्याकडे डोळेझाक करीत होते. नितीशकुमार यांनी याचा फायदा घेतला.

नितीश यांनी आपले लक्ष बिहारच्या राजकारणावर केंद्रित केले. बिहारमध्ये राबड़ी राजविरोधात मोहीम सुरू केली. त्यांनी केलेल्या मेहनतीचा फटका राबडी यांना बसला आणि २००५ च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयू-भाजप युती जिंकली. राज्यात हे आघाडी सरकार स्थापन झाले आणि नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून मात्र नितीश कुमार यांनी पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही.

३ मार्च २००० ते १० मार्च २००० पर्यंत बिहारचे २९ वे मुख्यमंत्री

२४ नोव्हेंबर २००५ ते २४ नोव्हेंबर २०१० ३१ बिहारचे मुख्यमंत्री

२५ नोव्हेंबर२०१० ते १९ मे २०१४ बिहारचे ३२ वे मुख्यमंत्री

२२ फेब्रुवारी २०१५ ते १९ नोव्हेंबर २०१५ बिहारचे ३४ वे मुख्यमंत्री

२० नोव्हेंबर२०१५ ते २६ जुलै २०१७ बिहारचे ३५ वे मुख्यमंत्री

२७ जुलै २०१७ पासून तर आजपर्यंत बिहारचे 36 वे मुख्यमंत्री

१६ वर्षांपासून का लढवित नाही निवडणूक ?
नितीश विकास पुरुष म्हणून ओळखले जातात. असं म्हणतात की त्यांनी बिहारची प्रतिमा बदलली. एवढे मोठे नेते असूनही नितीश कुमार निवडणूक का लढवत नाहीत? नितीशकुमार यांनी 2004 मधील शेवटची निवडणूक लढविली होती. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत नितीश नालंदा आणि बाढ़ येथून दोन ठिकाणी लढले.त्यांनी बाढ़ या मतदारसंघातून सलग विजय मिळविला, परंतु २००४ च्या निवडणुकीत त्यांना बाढ़ या त्यांच्या मतदार संघात धोक्याची परिस्थिती दिसली. म्हणून त्यांना त्यांचा मूळ जिल्हा नालंदाचा आठवला आणि त्यांनी मुजफ्फरपूर या मतदारसंघातून जॉर्ज फर्नांडिस आणि स्वत: नालंदा या मतदारसंघातून निवडणूक लढविली.

नितीशची भीती खरी ठरली आणि बाढ़ या मतदारसंघातून नितीश यांना आरजेडीच्या विजय कृष्णाकडून मोठा पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु, ते नालंदामधून जिंकले. पण असे म्हणतात की या पराभवामुळे नितीशला मोठा धक्का बसला. बाढ़ लोकसभा क्षेत्रातील बख्तियारपूरशी त्यांचा जवळचा संबंध आहे. ते तिथेच शिकले आणि वाढले सुद्धा पण या पराभवनानंतर ते पुन्हा निवडणूक लढलेच नाही.२००५ मध्ये जेडीयू आणि भाजपची युती जिंकली तेव्हा ते खासदार होते. २००५ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खासदार पदाचा राजीनामा दिला आणि ते विधानपरिषदेचे सदस्य झाले. नितीश हे २००६ मध्ये बिहार विधानपरिषदेचे सदस्य झाले आणि तेव्हापासून ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत.

त्याचवेळी बिहारचे ज्येष्ठ पत्रकार अरुण पांडे यांना या विषयाबद्दल विचारले असता ते म्हणाले की ते अनैतिक आहे.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नेहमीच विधानसभा निवडणुका लढविल्या पाहिजेत आणि जिंकून मुख्यमंत्री व्हावे.निवडणुका म्हणजे काय ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.तर हे नेत्याच्या कार्याचे जनतेने दिलेले म्हणजेच सार्वजनिक प्रतिबिंब आहे.जर नितीश चांगले काम करत असतील तर त्यांनी अवश्य निवडणुक लढली पाहिजे.परंतु हे आश्चर्यकारक आहे की बिहारचे दोन मोठे नेते जेडीयूचे नितीश कुमार आणि भाजपचे सुशील कुमार मोदी हे दोघेही विधानपरिषदेचे सदस्य आहेत पण निवडणूक लढवत नाहीत. एक मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री.

अरुण पांडे म्हणतात की,या नेत्यांना सुरक्षित झोनमध्ये रहायचे आहे. जर निवडणुका लढविल्या तर त्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागेल आणि निवडणुकांच्या वेळी इतर जागांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कमी वेळ मिळेल. ज्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. कदाचित म्हणूनच नितीश सारख्या नेत्यांना निवडणुका लढवायच्या नसतात पण मी ते अनैतिक मानतो.तथापि, ते म्हणाले की २००४ च्या बाढ़ या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हरल्यानंतर नितीश जोखीम घेऊ इच्छित नाहीत असा माझा विश्वास नाही. यावेळी नितीश कुमार विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत काय,काय ते पुन्हा सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होतील. निवडणुका लढण्याची शक्यता खूपच कमी आहे, परंतु नंतर मुख्यमंत्री होऊ शकणार का, हे तर पुढची वेळ सांगेल.