बिहारमध्ये ‘तेजस्वी’ पर्व सुरू होईल : खा. राऊत

बिहार वृत्तसंस्था : बिहार विधानसभा (Bihar Election) निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला कौल मिळताना दिसत आहे. सध्या एनडीए (NDA) आणि महाआघाडीत अटीतटीची लढत सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, महाआघाडी काही जागांनी एनडीएच्या पुढे आहे. सुरुवातीचा कल पाहून भाष्य करताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी तेजस्वी यादव (Tejswi Yadav )यांचे राज्य येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

निकालाविषयी राऊत म्हणाले, निवडणुकीचे पूर्ण निकाल हाती यायचे आहेत. जे कल आले आहेत त्यात एका तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन जी ताकत उभी केली होती. आता अटीतटीची लढत आहे. मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल. जेव्हा संपूर्ण निकाल हाती येईल, तेव्हा लोक जंगलराज विसरून गेलेले असतील, अन् मंगलराजला सुरुवात झालेली असेल, असे राऊत म्हणाले.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, बिहारमध्ये सर्वांत वेगवान तेजस्वी. तेजस्वींच्या समोर पंतप्रधान, त्यांची फौज, केंद्रीय मंत्रिमंडळ, नितीश कुमार यांचे सरकार. सत्ता, संपत्ती, ताकद संपूर्ण उभी होती. पण एका तरुणाने ज्या पद्धतीने सगळ्यांसमोर आव्हान उभे केले होते. बिहारमध्ये ज्याप्रमाणे तो लढत आहे. मला वाटतं हा एक चांगला संकेत आहे. जंगलराजविषयी बोलले जात होते. 15 वर्षांपासून नितीश कुमार यांचे सरकार होते. मग कोणतं जंगलराज होते. मला वाटते जंगलराज संपवून आज तेजस्वींच्या नेतृत्वात मंगलराज सुरू होईल, असेही राऊत म्हणाले.