‘या’ न्यायाधीशांच्या निर्णयाचे देशभरात होतेय कौतुक, एका झटक्यात सावरले मुलाचे भविष्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाल न्याय समितीचे अध्यक्ष मानवेंद्र मिश्रा यांच्या निर्णया संदर्भात पुन्हा एकदा देशपातळीवर चर्चा होत आहे. न्यायाधीशांनी मारहाणीच्या आरोपावरून बालकाची सुटका करताना एसपीला आचार प्रमाणपत्रात या प्रकरणाचा उल्लेख करु नये असे निर्देश दिले आहेत. या आरोपीची आसाम रायफलमध्ये रायफलमॅन म्हणून निवड झाली असून पुढील महिन्यात तो ज्वाईन होणार आहेत.

FIR मध्ये होते नाव
जर या एफआयआरचा उल्लेख त्याच्या आचार प्रमाणपत्रात केला असेल तर तो सेवेपासून वंचित राहिला असता. वास्तविक, ११ जुलै २००९ रोजी अस्थावां पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात चापाकलच्या नाल्यावरून दोन पक्षात भांडण झालं , त्यात किशोर आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांविरूद्ध पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तो १४ वर्षाचा होता. या प्रकरणात, २४ सप्टेंबर रोजी जेजेबीकडे आरोपपत्र सोपविण्यात आले होते, त्यानंतरही आरोपी किशोरने धैर्य गमावले नाही आणि योग्य मार्गावर चालून समाजासमोर आदर्श निर्माण केला. किशोरने १२ वर्ष कोर्टात फेऱ्या मारण्याबरोबरच अभ्यास सुरू ठेवला आणि कठोर परिश्रमामुळे त्याची बीएसएफमध्ये निवड झाली. तो पुढच्या महिन्यात त्यात भरती होणार आहे.

५ दिवसांच्या आत खटल्याची सुनावणी
लोक या निर्णयाचे कौतुक करीत आहेत. न्यायाधीशांनी या खटल्याची सुनावणी केवळ ५ दिवसात करत मुलाची सुटका केली. दरम्यान, न्यायाधीश मानवेंद्र मिश्रा यांनी असे अनेक निर्णय दिले आहेत, ज्यामुळे किशोर गुन्हेगारीचे जग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत.