भितीदायक नवीन रिपोर्ट ! डोळ्यातून रक्त वाहणारा ताप, डायरिया, हंताव्हायरस…कोरोनानंतर विध्वंस करू शकतात ‘हे’ 16 आजार

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर सुरू असतानाच एक भितीदायक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये 16 असे आजार सांगण्यात आले आहेत, जे कोरोना व्हायरस नंतर विध्वंस करू शकतात. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या ग्रुपने याबाबत इशारा दिला आहे. सीईपीआय नावाच्या या ग्रुपला फंडिंग बिल गेट्स करतात. या ग्रुपने जगाला इशारा दिला आहे की, जर वेळेत योग्य पावले उचलली नाहीत तर या भयंकर आजारांनी होणारा विध्वंस रोखणे केवळ अशक्य होईल. हे आजार महामारी होण्यापासून अवघी काही पावले दूर आहेत.

16 आजार उंबरठ्यावर, 27 प्रतिक्षेत
सीईपीआयने आपल्या रिपोर्टमध्ये 16 अशा आजारांचा उल्लेख केला आहे, जे वेगाने पुढे येत आहेत. याशिवाय 27 असे आजार सुद्धा आहेत, ज्यांच्यामध्ये महामारी बनण्याची क्षमता आहे. या रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरसचे इतर प्रकार जसे सार्स आणि मर्सच्या संभाव्य धोक्याबाबत सुद्धा सांगितले आहे. रिपोर्टनुसार पुन्हा पसरत असलेला कोरोना व्हायरस जर सार्स आणि मर्ससोबत एकत्र झाला तर याचे परिणाम खुपच घातक असतील. असे झाल्यास संपूर्ण मानव जातीसाठी धोका निर्माण होऊ शकतो. या भितीदायक रिपोर्टमध्ये आचआयव्ही आणि इबोलासारखे आजार पुन्हा परत येण्याची शंकासुद्धा व्यक्त केली आहे.

16 लाख व्हायरसपैकी केवळ एक होता कोरोना व्हायरस
‘द सन’ मध्ये प्रसिद्ध रिपोर्टनुसार, कोविड-19 तर अवघा एकच आजार होता. या व्हायरसच्या कुटुंबातील 16 लाख व्हायरसचा अजून शोध लावणे बाकी आहे. हा व्हायरस पशू आणि पक्षांमध्ये आहे असे मानले जाते. यापैकी कोणताही व्हायरस पुढील कोरोना व्हायरस बनून पुढे येऊ शकतो.

क्रिप्टोस्पोरीडिओसीसी बहिरेपणा येणारा घातक आजार
क्रिप्टोस्पोरीडिओसीसी डायरियाचाच एक प्रकार आहे, जो अशा सुक्ष्म परावलंबी व्हायरसद्वारे पसरतो, जो मनुष्य आणि पशूच्या आतड्यांमध्ये मोठ्या कालावधीपर्यंत जिवंत राहू शकतो. स्वीमिंग पूल, हॉट टब, जकूजी इत्यादी हा सापडू शकतो. मुलांमध्ये हा आजार खुप घातक आहे. इम्यून सिस्टम कमजोर असेल तर मृत्यू होऊ शकतो. अनेक प्रकरणात चेहर्‍यावर सूज, तोंड-नाक-गुप्तांगातून रक्त येणे किंवा झटके येणे असे प्रकार होऊ शकतात. 25 टक्के लोकांमध्ये या आजारानंतर बहिरेपणा येतो.

उंदरांकडून पसरणारा आजार
उंदरांद्वारे अनेक जूनोटिक रोग मनुष्यात पसरू शकतात. व्हाईट वॉटर आरोयोने कॅलिफोर्नियात तीन महिलांचा मृत्यू झाला. हा जंगलात राहणार्‍या उंदरांमुळे होतो. यामध्ये लीव्हर सुद्धा फेल होऊ शकते. लासा ताप अफ्रीकामध्ये अनेक भागात पसरला आहे. नायजेरियामध्ये यामुळे 144 लोकांचा मृत्यू झाला होता. उंदरांमुळे पसरणारा आजार हंता व्हायरसचा शोध 1993 मध्ये लागला होता. यामध्ये 36 टक्के रूग्णांचा मृत्यू होतो. अशाच प्रकारे हेपेटायटिस सी आहे, ज्याने 2016 मध्ये 4 लाख लोकांचा जीव घेतला होता. हेपेटायटिस ए आणि बी साठी व्हॅक्सीन आहे, परंतु सी साठी नाही मॅड काऊ, एचआयव्ही, बर्ड फ्लू आणि इबोलाचा सुद्धा धोका वाढत आहे.