आम्ही आठवड्यात नव्या कोरोनावर प्रभावी लस तयार करू शकतो : बायोटेकचा दावा

बर्लिन : पोलिसनामा ऑनलाईन – युरोपातील ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जगात आणखी खळबळ माजली आहे. या नव्या प्रकाराच्या भीतीने काही देशांनी ब्रिटनला जाणार्‍या तसेच येणार्‍या विमानांवर बंदी घातलीय. कोरोना विषाणूचा म्युटेशनला रोखणारी किंवा नियंत्रित करणारी लस/व्हॅक्सिन 6 आठवड्यात तयार करू शकतो, असा दावा बायोटेक कंपनीने केला आहे.

बायोटेक कंपनीचे सहसंस्थापक उगर साहिन यांनी सांगितले की, विषाणूच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी आवश्यक असलेली इम्युनिटी व्हॅक्सिनमुळे तयार होणे शक्य आहे. कोरोना विषाणूवर सध्याची लस ज्या पद्धतीने तयार केली आहे, त्यामुळे आम्ही नव्या कोरोनाच्या प्रकारावर प्रभावी लस तयार करु शकतो. यासाठी आवश्यक त्या सुविधा आमच्याकडे आहेत. तसेच गरज पडल्यास तांत्रिकदृष्ट्या 6 आठवड्यांच्या आत नवीन लस आणू शकतो.

तसेच उगर साहिन यांनी असंही म्हटलं आहे की, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा जो प्रकार आढळला आहे त्यात 9 म्युटेशन आहेत. सर्वसामान्यपणे केवळ एक म्युटेशन असतं. फायझरसोबत तयार केलेली लस/व्हॅक्सिन प्रभावी असेल. कारण यात 1 हजारांहून अधिक अमीनो अ‍ॅसिड आहेत. त्यातील केवळ 9 मध्ये बदल झालाय. म्हणजेच 99 टक्के प्रोटीन अजूनही समान आहेत.

विषाणूच्या नव्या प्रकारावर टेस्ट सुरु आहेत. पुढच्या दोन आठवड्यामध्ये त्याची माहिती मिळण्याची शक्यता असून लस/व्हॅक्सिन विषाणूच्या नव्या प्रकाराविरोधात प्रभावी ठरेल, असा विश्वासही उगर साहिन यांनी व्यक्त केलाय.

मात्र, यावर चाचणी झाल्यानंतर लस/व्हॅक्सिन किती प्रभावी असेल हे समजेल. याबाबत लवकर आकडेवारी आम्ही प्रकाशित करू, असंही साहिन यांनी सांगितलं आहे.

कोरोना विषाणूचा नवा प्रकार आल्यानंतर भारताने नवी मार्गदर्शक तत्वे जारी केलीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्या नियमांनुसार ब्रिटनवरून येणार्‍या प्रवाशांना ज्यांच्यात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळतोय त्यांना वेगळ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले जाणार आहे. याशिवाय पॉझिटिव्ह आढळलेल्या सहप्रवाशांना संस्थांत्मक क्वारंटाइन केले जाणार आहे.