तिच्यावर बनतोय बायोपिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा चांगलाच ट्रेंड सुपरहिट ठरला आहे. प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावरील सिनेमे रसिकांना भावले आहेत. मेरी कोम, मिल्खा सिंग, महेंद्रसिंह धोनी, संजय दत्त, सनी लिओनी असे एक ना अनेक लोकप्रिय व्यक्तींच्या जीवनावरील बायोपिक रसिकांची दाद मिळवून गेले आहेत. आता बॉलीवूडमध्ये आणखी एका बायोपिकची चर्चा सुरु झाली आहे. हा बायोपिक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार शकीला हिच्या वादग्रस्त जीवनावर आधारित आहे.

[amazon_link asins=’B016OQLOLM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2169e30f-979c-11e8-8ca7-d7e0bfe24c34′]

सिल्क स्मिता हिच्या जीवनावरील विद्या बालन हिचा ‘डर्टी पिक्चर’ खूपच लोकप्रिय ठरला होता. याच सिल्क स्मिताला आदर्श मानणाऱ्या शकीला ची कारकिर्दीतही अशीच वादग्रस्त आणि अनेक गॉसिपने भरली आहे. अडल्ट सिनेमांमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या शकीलाने वयाच्या २०व्या वर्षी १९९५ साली आलेल्या प्लेगर्ल्स या पॉर्न सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. याच शकीलाचे वादग्रस्त आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले होते. त्यात शकीलाने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट आणि खुलासे केले होते. तिचे हेच खुलासे आता सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येणार आहेत. आपल्या आईने जीवन उद्धवस्त केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट शकीलाने यांत केला होता. आईच्या परवानगीने एका व्यक्तीने बलात्कार केला होता. त्या मोबदल्यात आईला त्याने पैसे दिले होते असा खुलासा तिने या आत्मचरित्रात केला आहे.

शालेय जीवनात इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या शकीलाला सहावीनंतर दुदैर्वाने परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. उदरनिवार्हासाठी मग आईनेच वेश्या व्यवसायात ढकलल्याचे तिने सांगितले आहे. वेश्या व्यवसाय करतानाच सुरुवातीच्या काळात फुकटात पॉर्न सिनेमात काम केल्याचेही तिने आत्मचरित्रात नमूद केले आहे. मात्र कालांतरानं तिचं जीवन पालटलं आणि दाक्षिणात्य पॉर्नस्टार म्हणून ती लोकप्रिय झाली.

शकीलाचे नाव अनेक दिग्दर्शक आणि कलाकारांशीही जोडले गेले. तिच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या, मात्र ती अविवाहितच राहिली. तिचा हाच जीवनपट रुपेरी पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री रिचा चढ्ढा ही शकीलाची भूमिका साकारत आहे. नुकतेच या सिनेमातील शकीलाचा म्हणजेच रिचाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. शकीला साकारणाºया रिचाने यात केरळची पारंपरिक साडी परिधान केली आहे.