Uddhav Thackeray | ‘मर्दाची औलाद असाल तर या सरकारी यंत्रणा…’, उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान (व्हिडिओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शिवसेनेत (Shivsena) फटू पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. दरम्यान, आज त्यांनी अमरावतीमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्रातील सरकारला आणि भाजपला थेट आव्हान दिले आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, आज तुमच्याकडे खोकेच्या खोके पडले आहेत. तुम्ही आमदार विकत घेताय असं मी ऐकतोय.
पण त्याच पैशातून माणसं वाचवा ना. माणसं वाचवली तर तुम्हाला कोणाला विकत घेण्याची गरज लागणार नाही. (Maharashtra Politics News) मतंसुद्धा विकत घ्यावी लागणार नाहीत. पण काम करायचं नाही. नुसतं हे फोड ते फोड करायचं, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला.

तुम्ही घरफोडे आहात

तुम्ही घरफोडे आहात. मी घरात बसून जे काम केले, ते तुम्हाला घर फोडूनही करता येत नाही. त्यामुळेच तुम्हाला दारोदारी जावं लागत आहे.
सरकार आपल्या दारी म्हणता, पण तुम्हाला कोणी दारातही उभं करत नाही. मग अंगणवाडी सेविकांना बोलवता,
पोलिसांना साध्या कपड्यात बसवता, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शासन आपल्या दारी (Shasan Aaplya Dari) उपक्रमावर जोरदार
प्रहार केला.

पक्ष फोडण्याची गरज का वाटते?

मी तर घरी बसलो होतो, तरी सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. तसं संपूर्ण जगामध्ये नंबर एकचे पंतप्रधान आपल्या देशाचे
पंतप्रधान असतानाही तुम्हाला अजूनही इतर पक्ष फोडण्याची गरज का वाटते? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला.
ते पुढे म्हणाले, शिवसेना पक्ष चोरला, आज राष्ट्रवादी (NCP) चोरली, उद्या आणखी काही चोरतील. जे काही देशाचं आहे ते विकून टाकायचं.
जे राहिलं ते विकून टाकायचं आणि इतर ठिकाणी काही ठेवायचं नाही. दुसऱ्याचं आहे ते चोरायचं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

जर तुम्ही मर्दाची अवलाद असाल

भाजपसाठी दोन शब्द आहेत एक आहे मस्ती आणि दुसरा आहे आत्मविश्वास. भाजपला सत्तेची मस्ती आली आहे.
पण त्यांच्या ताकदीचा आत्मविश्वास त्यांच्याकडे नाही. आपण एवढे मोठे झालो, सत्ताधीश झालो, तरीही त्यांना धाकधूक वाटते की
आपण निवडून येऊच शकत नाही. सत्तेची मस्ती हीच ती. मग ईडी (ED) लाव, सीबीआय लाव (CBI), पोलीस लाव (Police) असं करायचं.
विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जातो आहे. पोलिसांमार्फत नोटीसा दिल्या जात आहेत.
जर तुम्ही मर्दांची अवलाद असाल तर या सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि या मैदानात, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं.

आमच्या खांद्यावर बसून मोठे झालात आणि…

एकतर राजकारणामधील नामर्द तुम्ही, कधी तुमची ताकद होती. आज अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
तसाच महाराष्ट्रही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला कुणी ओळखत नव्हतं तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला
खांद्यावर बसवून मोठं केलं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
आमच्या खांद्यावर बसून मोठे झालात आणि आज आम्हाला संपवायला निघालात? हे तुमचं हिंदुत्व? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

Web Title :  Uddhav Thackeray | uddhav thackerays challenge over bjp through government agencies in amravati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar On Sadabhau Khot | शरद पवारांना ‘सैतान’ म्हणणाऱ्या सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी सुनावले खडेबोल, म्हणाल्या – ‘आपला आवाका आणि कुवत बघून बोला’

Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘मला हलताही येत नव्हतं हे खरं, पण तेव्हा…’, एकनाथ शिंदेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणार्‍याला बुधवार पेठेतून अटक; अग्नीशस्त्र जप्त

Maharashtra Rain Update | राज्यभर 12 ते 14 जुलैदरम्यान हलक्या सरींची शक्यता; IMD