ITR Filing Mistakes : आयकर रिटर्न भरताना झाली असेल चूक, तर सहजपणे करू शकता सुधारणा, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर जर तुम्हाला वाटते असेल की, तुमच्याकडून आयटीआर भरताना एखादी चूक झाली आहे, किंवा एखादी आवश्यक माहिती भरायची राहून गेली आहे, तर आता अस्वस्थ होण्याची गरज नाही. तुम्ही आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवरून एका निश्चित कालावधीच्या आत आपल्या आयटीआरमध्ये सुधारणा करू शकता. मात्र, तुम्ही मॅन्युअली आयटीआर भरले आहे तर त्यामध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा ऑनलाइन माध्यमातून दुरूस्ती करता येणार नाही. दुरूस्त आयटीआरचा अभिप्राय इन्कम टॅक्स कायदा कलम 139(5) च्या अंतर्गत करेक्शनसोबत भरण्यात आलेल्या आयटीआरशी असतो.

दुरूस्त आयटीआर ऑनलाइन भरण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस अशी आहे :

1 सर्वप्रथम आयकर विभागच्या ई-फायलिंग पोर्टल https://www.incometaxindiaefiling.gov.in/homeवर लॉग ऑन करा.

2 आपला पॅन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोडसह ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा.
E-File’ मेन्यूवर क्लिक करा आणि यानंतर ’Income Tax Return’च्या लिंकवर क्लिक करा.

3 Income Tax Return पेजवर तुमचा पॅन नंबर येईल.

4 आता असेसमेंट ईयर आणि आयटीआर फॉर्म नंबर निवडा.

5 आता ’फायलिंग टाईप’ मध्ये ओरिजिनल/ रिवाइज्ड रिटर्न चा पर्याय निवडा.

6 यानंतर ’सबमिशन मोड’मध्ये ’Prepare and Submit Online’वर क्लिक करा.

7 ’जनरल इन्फॉर्मेशन’ टॅबच्या अंतर्गत ऑनलाइन आयटीआर फॉर्ममध्ये ’Return Filing Section’मध्ये ’रिवाईज्ड रिटर्न अंडर सेक्शन 139(5)’ आणि ’Return Filing Type’ मध्ये ’Revised’ निवडा.

8 आता ओरिजिनल आयटीआरमध्ये असलेला ’एक्नॉलेजमेंट नंबर’ आणि आयटीआर फाइल केल्याची तारीख निवडा.

9 आता संबंधित माहिती भरा आणि त्यानंतर त्यामध्ये दुरूस्ती करा तसेच आयटीआर सबमिट करा.

रिटर्न ई-व्हेरिफाय करा

Income Tax Return इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरिफाय करण्याची प्रक्रिया अशी :
Aadhaar OTP : आयटीआर फाईल करण्यासाठी आधार पॅनशी लिंक करणे आवश्यक असते. यामुळे टॅक्सपेयर्स ई-फायलिंग पोर्टलमध्ये लॉग-इन केल्यानंतर ’जेनरेट आधार ओटीपी’वर क्लिक करू शकता. आता तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी प्राप्त होईल. हा ओटीपी केवळ 10 मिनिटासाठी वॅलिड असेल. आयटीआर व्हेरिफाय करण्यासाठी निर्देशीत स्थानावर ओटीपी टाका. यानंतर तुम्हाला नोंदणीकृत इमेल आयडीवर एकनॉलेजमेंट प्राप्त होईल.

E-Filling Portal च्या द्वारे जेनरेट करण्यात आलेल्या EVC च्याद्वारे : जर तुमचे उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे तर तुम्ही ई-फायलिंग पोर्टलद्वारे आपले आयटीआर व्हेरिफाय करू शकता.