Panvel News : भाजपा नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन –   पनवेल महापालिकेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचे बुधवारी (दि. 17) कोरोनामुळे निधन झाले. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या नगरसेवक भोपी यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.