भाजप नगरसेवकाने महिला अधिकाऱ्यास पाठविले अश्लील संदेश, नगरसेवक फरार

बीड : पोलीसनामा आॅनलाइन – एका महिला अधिकाऱ्याच्या मोबाईलवर भाजप नगरसेवकाने अश्लील संदेश पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर महिला अधिकाऱ्याने केलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईची कुणकुण लागताच हा नगरसेवक फरार झाला आहे. लैंगिक छळासंबंधीच्या मी टू मोहिमेत सापडलेल्या एम. जे. अकबर सारख्या महाभागांमुळे अगोदरच भाजप अडचणीत सापडला आहे. त्यातच स्थानिक पातळीवरही असे प्रकार घडत असल्याने एकुणच भाजपच्या प्रतिमेवर याचा परिणाम होत आहे. भाजप नेतृत्वाने अशा प्रकरणात कठोर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

बळीराजाने सरकारला एक दमडीचीही अोवाळनी देऊ नये : राज ठाकरेंचे आणखी एक व्यंगचित्र

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यतील केज येथील एका महिला अधिकाऱ्याला भाजपचे नगरसेवक रवि अंधारे यांनी मोबाईलवर फोन केला. मात्र, नंबर ओळखीचा नसल्याने महिला अधिकाऱ्याने तो घेतला नाही. नंतर या नगरसेवकाने महिला अधिकाऱ्यास अश्लील संदेश पाठवला. याप्रकरणी रवि अंधारे यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंग व सायबर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समोरासमोर, हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या 

३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान महिला अधिकाऱ्याला तब्बल सात वेळा रवि अंधारे यांनी फोन आला. अनोळखी क्रमांक असल्याने त्यांनी फोन घेतला नाही. पहाटे साडेपाच वाजता उठल्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर सात मिस्डकॉल दिसून आले. त्यानंतर त्याच क्रमांकावरून त्यांना अश्लील संदेश आल्याचे दिसले. कार्यालयात आल्यानंतर त्यांनी निनावी फोन करणाऱ्याचा शोध घेतला असता तो क्रमांक केज येथील भाजपचे नगरसेवक रवि अंधारे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अंधारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us