तलवारीचा धाक दाखवून भाजप नगरसेवकाला ४ लाखाला लुटले

वसमत : पोलीसनामा ऑनलाईन – तलवारीचा धाक दाखवून भाजपच्या नगरसेवकाला लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार वसमत-आसेगाव मार्गावरील टाकळगाव येथे घडली. ४ चोरट्यांनी त्यांच्याकडील नगदी २० हजार ५०० रुपयांसह साडेचौदा तोळे सोने लुटले. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

सिताराम म्यानेवार असे लुबाडण्यात आलेल्या नगरसेवकाचे नाव आहे. तर त्यांन दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

म्यानेवार आणि त्यांचा मित्र नांदेड येथून शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास आसेगाव मार्गे वसमतकडे जात होते. त्यावेळी टाकळगावजवळ आल्यावर गतिरोधक असल्याने कारचा वेग कमी झाला. त्यांनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारच्या हेडलाईड फोडून त्यांना चाकू आणि तलवारीचा धाक दाखवून अंगावरील साडे चौदा तोळे सोने काढून देण्यास लावले. तसेच त्यांच्याकडील रोख रक्कमही काढून घेतली. त्यानंतर त्यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे.