आझम खान यांचे ‘शीर’ कापून संसदेच्या दारावर ‘टांगा’, भाजप नेत्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप खासदार रमा देवी यांच्याबाबत केेलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता समाजवादी पक्षाचे आझम खान यांच्यावर भाजपकडून टीका करण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर आता भाजप नेते आफताब अडवणी यांनी टीका करताना आणखी वाद निर्माण केला आहे. ते म्हणाले की, भारत सरकारला आमची विनंती आहे की, आझम खान यांचे शीर कापून संसदेत दरवाजाला टांगण्यात आले पाहिजे. ज्यामुळे आझम खान आणि ओवेसी यांच्या सारख्यांना महिलांचा अपमान केल्यास काय परिणाम होईल याची जाणीव होईल.

गुरुवारी लोकसभेत तिहेरी तलाकवर चर्चा सुरु असताना आझम खान यांनी भाजपच्या खासदार रमा देवी यांच्यावर टिप्पणी करत म्हणले की, तुम्ही मला इतक्या आवडतात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहावेसे वाटते. या विधानावर सभागृहात भाजप खासदारांनी आक्षेप घेत गोंधळ घातला.

पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे त्यांची हत्या करा –
भाजप नेते अडवणी म्हणाले की, महिलांचा अपमान आता सहन केला जाणार नाही. याआधी जयाप्रदा आणि आता भाजप खासदारावर त्यांनी अशा प्रकारे टिप्पणी केली आहे. हे निषेधार्थ आहे. मी या आधी देखील म्हणले आहे की हा म्हातारा वेडा झाला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे त्यांची हत्या करणे गरजेचे आहे. त्यांच्यापासून आता आपल्या देशाला धोका आहे.

आझम खान देशातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मुळे महिलांना अपमान सहन करावा लागतो. त्यांच्या या सततच्या विधानांमुळे दिवसेंदिवस महिलांप्रती आदर कमी होत चालला आहे. हे देशासाठी चांगले नाही अशी टीका देखील अडवणी यांनी केली.

काय आहे प्रकरण –
लोकसभेत तिहेरी तलाकवर चर्चा सुरु असताना बोलताना आझम खान यांनी रमा देवी यांच्यावर टिप्पणी केली की, तुम्ही मला इतक्या आवडतात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहावेसे वाटते. यावेळी रमा देवी यांनी आझम खान यांच्या विधानावर आक्षेप देखील घेतला. यावर आझम खान यांची सांगितले की तुम्ही खूप आदरणीय आहात, माझ्या बहिणीसारख्या आहात.

आरोग्यविषयक वृत्त –