BJP Leader Killed | काश्मीरमध्ये आणखी एका BJP नेत्याची गोळी मारून हत्या, 2 वर्षात दहशतवाद्यांनी 21 जाणांना बनवले ‘निशाणा’

श्रीनगर : वृत्तसंस्था –  BJP Leader Killed | जम्मू-कश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) आणखी एका भाजपा नेत्याची (BJP Leader Killed) दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली आहे. मागील दोन वर्षात दहशतवाद्यांनी 21 भाजपा नेते-कार्यकर्ते यांना निशाणा बनवले आहे. दक्षिण काश्मीर (South Kashmir) च्या कुलगाम जिल्ह्यातील ब्राजलु परिसरात भाजपा नेते जावीद अहमद डार (Javid Ahmad Dar) यांची दहशतवाद्यांनी घरात घुसून हत्या केली. आतापर्यंत अशी बहुतांश प्रकरणांची जबाबदारी द रजिस्टन्स फ्रंट (TRF) नावाच्या संघटनेने घेतली आहे. पोलिसांनुसार ही संघटना लश्कर-ए-तैयबा (lashkar-e-taiba) चालवत आहे.

डार यांच्या हत्येनंतर पोलीस आणि सीआरपीएफने परिसर सील केला आहे.
दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. डार कुलगाम होमशालीबाग विधानसभा मतदार संघाचे प्रभारी होते.
भारतीय जनता पार्टीने या घटनेचा निषेध केला आहे.
काश्मीर भाजपाचे मीडिया सेल हेड मंजूर अहमद यांनी जावीद यांच्या हत्येचा निषेध केला आहे.

सतत होत आहेत भाजपा नेत्यांवर हल्ले

यापूर्वी मागील गुरुवारी दहशतवाद्यांनी राजौरीमध्ये भाजपाचे मंडळ प्रमुख जसवीर सिंह यांच्या घराला निशाणा बनवत ग्रेनेड हल्ला केला होता.
तर अनंतनागमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपा नेता आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली होती.
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात भाजपा नेता आणि त्याच्या पत्नीची गोळ्या घालून चाळण करण्यात आली होती.

उमर अब्दुल्ला यांनी केला निषेध

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दूल्ला यांनी या घटनेला भयावह म्हटले आहे.
त्यांनी यास ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ म्हटले. अब्दुल्ला यांनी हत्येचा निषेध करत जावीद अहमद डार यांच्या शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले.

 

Web Title : BJP Leader Killed | militants shot dead a bjp worker in brazlu area of kulgam district in south kashmir

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Udayanraje Bhosale | खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कोरोना पॉझिटिव्ह?, 4 दिवसांपासून पुण्यात सुरु आहेत उपचार

MNS Vs Sambhaji Brigade | प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं पाठवली थेट ‘कृष्णकुंज’वर; वाद चिघळणार?

Pimpri Crime | ‘गेम’ वाजवण्यासाठी हवं होतं पिस्टल, खरेदीसाठी फोडले एटीएम; असा अडकला गुन्हे शाखेच्या जाळ्यात