सहाय्यक फौजदाराची कर्तव्यदक्षता अन् भाजप खासदाराची पायपीट

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – मुख्य शासकीय ध्वजारोहण असलेल्या पोलिस कवायत मैदानाच्या प्रवेशद्वारावर सहाय्यक फौजदाराने वरिष्ठांच्या आदेशानुसार कोणाचेही खासगी वाहन आत जाऊन दिले नाही. भाजप खासदार दिलीप गांधी यांचे वाहनही अडविण्यात आले. गांधी यांनी हुज्जत घालूनही त्यांची गाडी आत जाऊ दिली नाही. त्यामुळे गांधी यांनी पायपीट करीत ध्वजारोहणस्थळ गाठले.

ध्वजारोहणासाठी जात असलेल्या दोन एनसीसी(NCC) कॅडेट्सचा अपघाती मृत्यू

प्रजासत्ताकदिनी नगरचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा नेहमीप्रमाणे आज पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारातून शासकीय वाहन वगळता इतर कुठलेही वाहन सोडू नये, असा आदेश देण्यात आले होते. त्यामुळे प्रवेशद्वारावर नियुक्तिस असलेल्या पोलिसांकडून कोणतेही वाहन आत सोडले जात नव्हते. भाजपाचे खासदार दिलीप गांधी हे त्यांच्या गाडीतून ध्वजारोहणासाठी आले होते. परंतु, प्रवेशद्वारासमोरच सहाय्यक फौजदाराने गाडी अडविली. खासगी गाडी बाहेरच पार्किंग करून जावे लागेल, अशी विनंती केली. खासदाराची गाडी आहे, असे चालक व खा. गांधी यांनी सांगितले. सहाय्यक फौजदाराने खासगी वाहन कोणाचेही असले तरी प्रवेश देता येणार नाही. वरिष्ठांचे आदेश मी डावलू शकत नाही, असे स्पष्ट केले. या व्यक्तव्यावर खा. गांधी यांनी रोष व्यक्त करीत गाडीतून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. गाडीतून उतरून ते पायपीट करीत मुख्य ध्वजारोहण सोहळ्याकडे गेले.
खा. गांधी यांच्याकडून हुज्जत !

पोलिसांनी अडविल्यामुळे खा. दिलाप गांधी यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे ही बाब आज शहरात चांगलीच चर्चेचा विषय ठरला आहे.