BJP on Uddhav Thackeray | सचिन वाझे प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर भाजपचे गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP on Uddhav Thackeray | हत्या आणि भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात असलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याच्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी गंभीर आरोप केले आहेत (BJP on Uddhav Thackeray). सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. ‘सचिन वाझे काही लादेन आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित करत वाझेची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Keshav Upadhye on Uddhav Thackeray)

 

केशव उपाध्ये म्हणाले की, ”सचिन वाझे काही लादेन आहे का ? असा प्रश्न करत विधिमंडळात वाझेची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिलं पाहिजे. एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून मनसुख हिरेन यांची हत्या (Mansukh Hiren Murder) माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हे सुद्धा शिवसेनेत (Shivsena) होते. त्यांनीही निवडणूक लढवली होती. शिवसेना नेत्यांशी त्यांचेही घनिष्ठ संबंध होते.” (BJP on Uddhav Thackeray)

 

एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून ?

”राज्यात ज्यांची सत्ता आहे त्या शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला गुन्हा गंभीर आहे. महत्त्वाचे म्हणजे हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्माला वाझेने 45 लाख रुपये दिले असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कोठून याचाही शोध घेणे आवश्यक आहे. याशिवाय हे पोलीस अधिकारी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होते हेही समोर आलं पाहिजे,” असेही ते म्हणाले.

 

”शिवसेनेचे बोलघेवडे नेते प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधत असतात. मात्र शिवसेनेच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या कृत्यामुळे पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का ? याच त्यांनी उत्तर द्यावे,” असे आवाहनही केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केले.

 

Web Title :- BJP on Uddhav Thackeray | bjp keshav upadhye demand explanation of cm uddhav thackeray over sachin waze

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा