BJP Parliamentary Board | भाजपच्या संसदीय समितीतून महाराष्ट्र ‘हद्दपार’, नितीन गडकरींना ‘वगळलं’ तर देवेंद्र फडणवीसांना ‘स्थान’ नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BJP Parliamentary Board | भाजपच्या नव्या संसदीय समितीची घोषणा करण्यात आली असून या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांचे नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता या समितीमध्ये (BJP Parliamentary Board) महाराष्ट्रातील एकाही नेत्याचा समावेश नाही. या भाजपने जाहिर केलेल्या समितीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना स्थान देण्यात येईल अशी चर्चा होती. परंतु त्यांच्याही नावाचा समावेश या समितीत केला नाही.

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर भाजपनं संसदीय समितीची घोषणा केली आहे. या समितीमधून (BJP Parliamentary Board) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan) यांना स्थान देण्यात आलेलं नाही. हे दोन्ही वरिष्ठ नेते आधी या समितीत होते. परंतु आता त्यांची नावं वगळ्यात आली आहेत. त्यांच्या जागी आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल (Assam Former CM Sarbanand Sonowal) आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Karnataka Former CM B.S. Yeddyurappa) यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

या समितीमध्ये सुधा यादव (Sudha Yadav), के. लक्ष्मण (K. Laxman), सत्यनारायण जटिया (Satyanarayana Jatia) आणि इक्बाल सिंह लालपुरा (Iqbal Singh Lalpura) या नेत्यांना समितीत स्थान देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah), भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President JP Nadda) आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) हे समितीत कायम आहेत.

नव्या संसदीय समितीसोबतच भाजपने केंद्रीय निवडणूक समितीची देखील घोषणा करण्यात आली आहे.
या समितीत एकूण 15 जण आहेत. या समितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. भाजपच्या निवडणूक समितीला तिकीट वाटपाचे अधिकार असतात.
त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीनं ही समिती महत्त्वाची मानली जाते.

 

Web Title : – BJP Parliamentary Board | bjp new parliamentary board announced nitin gadkari and shivraj singh chouhan not named

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा