home page top 1

भाजप नेता म्हणाला ; रणनीतीकार ‘प्रशांत किशोर ज्या कॉलेजचे विद्यार्थी, त्या कॉलेजचे ‘PRINCIPAL’ आहेत अमित शहा’

कोलकाता : वृत्तसंस्था – राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस पक्षाचे काम करणार आहेत. यावर भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय ने टीका करत म्हंटले की, प्रशांत किशोर ज्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत, त्या कॉलेजचे प्रिन्सिपल भाजप अध्यक्ष अमित शहा आहेत. त्यांनी म्हंटले की, बंगालच्या लोकांना आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास राहीला नाही. याला कोणताही निवडणुकीचा रणनीतीकर बदलू शकत नाही.

प्रशांत किशोर यांनी गुरवारी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. प्रशांत किशोर आता तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे रणनीतीकर असतील. त्यांनी गेल्यावर्षी ७ सप्टेंबरला जेडीयूमध्ये प्रवेश केला होता.

विजयवर्गीय म्हणाले की, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यापेक्षा प्रशांत किशोर मोठे रणनीतीकर नाहीत. किशोर यांना तृणमूल काँग्रेसचा रणनीतीकर बनवल्यामुळे आम्हाला कोणतीही काळजी नाहीय. ममता बॅनर्जी पाहिजे असेल तर अजून रणनीतीकार ठेऊ शकते.

२०२१ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला हरवणे भाजपचे लक्ष्य

भाजपने लोकसभा निवडणुकीमध्ये बंगालमधील ४२ लोकसभेच्या जागांपैकी १८ जागा जिंकल्या आहेत. तर तृणमूल काँग्रेसने २२ जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपमध्ये उत्साह आहे. २०२१ ला बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करून बंगालच्या विधानसभेवर झेंडा फडकविणे हे भाजपचे पुढील लक्ष्य आहे.

Loading...
You might also like