लोक कलावंताच्या मदतीला धावले भाजपाचे कार्यकर्ते; 62 कुटुंबांना किराणा किट वाटप

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –  शिरूर तालुक्यात जागरण – गोंधळ तसेच लोककलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य कलावंतांच्या मदतीसाठी पुढे येत भाजपा कामगार आघाडीच्या वतीने ६२ कुटूंबांना किराणा किट देउन मदत करण्यात आली.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून लॉक डाऊन सुरू आहे.या लॉक डाऊन काळात अनेक उद्योग,व्यवसाय बंद आहेत.त्याचबरोबर कलेच्या माध्यमातून स्वतःची गुजरान करणारा मोठा वर्ग आहे.सर्वत्र कडक लॉक डाऊन ची अमंलबजावणी सुरू असल्याने या सर्वसामान्य लोककलावंतांचे मोठे हाल होत आहे.

हीच बाब लक्षात घेत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी वाघ्या मुरळी संघटनेचे प्रमुख दगडू घोगरे यांच्याशी संपर्क करून तालुक्यातील सर्व कलावंत कुटुंबांची लिस्ट मागवली त्याप्रमाणे नियोजन करून जवळपास ६२ कुटुंबांना १० ते १५ दिवस पुरेल एवढे किराणा साहित्य यानिमित्ताने कोरेगाव भिमा, श्रीक्षेत्र वढू , सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, रांजणगाव गणपती, शिरूर शहर व इतर काही गावातील कलावंतांच्या कुटुंबीयांना देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित खैरे, उद्योजक संतोष गवारे, पंकज गवारे, विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष अक्षय ढमढेरे , अभिजित पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे म्हणाले की,समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन वाढलेल्या लॉकडॉऊनमुळे हतबल झालेल्या गरीब कुटुंबियांसाठी जे जे काही करता येईल, ती मदत करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी केले.