Black Fungus symptoms : AIIMS चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितली ’ब्लॅक फंगस’ची 5 प्रमुख लक्षणे, जाणून घ्या अन् बचाव करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही नुकतेच कोरोना व्हायरसमधून बरे झाला आहात किंवा उपचार घेत असाल आणि सतत डोकेदुखी किंवा चेहर्‍याच्या एकाबाजूला सूज सारखी लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे आणि सोबतच ब्लॅक फंगसची चाचणी करा.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, एम्स प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यानुसार, जर तुम्हाला तोंडाचा रंग बदलणे आणि चेहर्‍याच्या कोणत्याही भागात बधीरपणा, अशी लक्षणे जाणवत असतील तर तुम्हाला ब्लॅक फंगसची तपासणी केली पाहिजे.

गुलेरिया यांनी म्हटले, जर तुमचे नाक बंद होत आहे आणि जोर लागत असेल तर हे सुरूवातीचे संकेत आहेत की, ब्लॅक फंगसबाबत चिंता केली पाहिजे. याशिवाय जर तुमच्या दातांमध्ये ढिलेपणा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

ब्लॅक फंगसची चाचणी करण्यासाठी सायनसचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅन केला जातो. तसेच नाकाच्या एंडोस्कोपीच्या माध्यमातून बायोप्सी सुद्धा केली जाऊ शकते. त्यांनी सांगितले की ब्लड टेस्टिंगद्वारे सुद्धा याचा शोध घेतला जाऊ शकतो.

डॉ. गुलेरिया यांनी म्हटले की, भारतात ब्लॅक फंगसची जास्त प्रकरणे समोर येत आहेत. मात्र हे संसर्गजन्य नाही. कारण डायबिटीज आणि स्टेरॉईडचा जास्त वापर करणारी मोठी लोकसंख्या संसर्गजन्य नाही. त्यांनी म्हटले, पहिल्या लाटेत सुद्धा म्यूकोर्मिकोसिसची प्रकरणे समोर आली, मात्र स्टेरॉयडच्या अति वापरामुळे दुसर्‍या लाटेदरम्यान संख्या जास्त झाली आहे.

भारतात कोरोना व्हायरस महामारी दरम्यान ’ब्लॅक फंगस’चा धोका सुद्धा वेगाने वाढत आहे. एका रिपोर्टनुसार देशात या घातक व्हायरसची सुमारे सात हजार प्रकरणे आहेत. यास म्युकोर्मिकोसिस सुद्धा म्हटले जाते.

हे सामान्यपणे त्या रूग्णांमध्ये दिसून येत आहे ज्यांना मोठ्या कालावधीपर्यंत स्टेरॉईड दिले गेले होते, जे मोठ्या कालावधीपर्यंत हॉस्पिटलमध्ये दाखल होते, ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटरवर होते, अस्वच्छता किंवा जे डायबिटीज सारख्या इतर आजारांसाठी औषध घेत आहेत. जर वेळेवर याचा उपचार केला गेला नाही तर हा संसर्ग घातक होऊ शकतो.

ब्लॅक फंगसची लक्षणे
ब्लॅक फंगसच्या प्रमुख लक्षणांमध्ये तोंडाशी संबंधीत लक्षणे आहेत. यामध्ये तोंड, जीभ, हिरड्यांचा रंग बदलणे, भरलेले नाक, वेदना, चेहर्‍याची सूज, डोळ्यांच्या खाली जडपणा, अस्वस्थता, ताप आणि डोकेदुखीचा समावेश आहे.

ब्लॅक फंगसपासून बचावाचे उपाय
मौखिक स्वच्छता ठेवा
कोविडमधून बरे झाल्यानंतर, स्टेरॉईड आणि इतर औषधांचे सेवन तोंडात बॅक्टेरिया किंवा फंगस वाढवण्यास मदत करतात आणि सायनस, फुफ्फुसे आणि अगदी मेंदूत सुद्धा समस्या निर्माण करते. दिवसात दोन-तीन वेळा ब्रश करा. तोंडाची स्वच्छ करण्याने खुप मदत मिळू शकते.

ब्रश बदला
रूग्णांसाठी आजाराच्या प्रभावातून स्वतःला वाचवण्यासाठी कोरोना व्हायरसमधून बरे झाल्यानंतर चांगली मौखिक स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. रूग्णांना सल्ला दिला जातो की, त्यांनी एकदा नकारात्मक परीक्षण केल्यानंतर आपला टूथब्रश बदलावा आणि नियमित तोंड धुवत रहा.

टूथब्रश आणि टंग क्लीनर स्वच्छ ठेवा
कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांनी आपला ब्रश तिथे ठेवू नये जिथे घरातील अन्य लोक ठेवतात. याशिवाय ब्रश आणि टंग क्लीनर नियमितपणे अँटीसेप्टिक माऊथवॉशने स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जात आहे.

या लक्षणांवर ठेवा नजर
डॉक्टर लोकांना सल्ला देत आहेत की, चेहर्‍याच्या कोणत्याही भागात सूज, डोळ्यांच्या दृष्टीची समस्या किंवा डोक्याच्या एका भागात वेदना यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जर कोविड-19 मधून बरे होणार्‍या व्यक्तीला या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तात्काळ ईएनटी स्पेशलिस्टशी संपर्क साधा.

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया आणि एम्सचे डॉक्टर पीयूष रंजन यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी म्हटले की, एकदा संक्रमित झाल्यानंतर या फंगल संसर्गाचे लवकर निदान झाले तर रूग्णांचा जीव वाचवता येऊ शकतो.

त्यांनी म्हटले की, लक्षणे जाणून घेण्यासाठी कोरोनाच्या रूग्णांनी दिवसाच्या उजेडात नाक, गाल आणि डोळ्यांच्या आजूबाजूची चेहर्‍याची सूज, रंग बदलणे, वेदना इत्यादीसाठी तपासणी केली पाहिजे. डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, कोविड-19 ने बरे होण्याच्या दरम्यान आणि नंतर ब्लड शुगर लेव्हलची सुद्धा तपासणी करत राहिले पाहिजे.

देशात 7000 पेक्षा जास्त प्रकरणे
अंदाजानुसार, देशात ब्लॅक फंगसची 7,000 पेक्षा जास्त प्रकरणे आहेत. देशात सर्वात जास्त संसर्ग महाराष्ट्रातून समोर आला आहे. यानंतर गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, कर्नाटक, तेलंगनाचा नंबर येतो.