Black Sesame | बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर कढते ‘या’ काळ्या बियांचे पाणी, लिव्हर करते मजबूत, 5 फायदे जाणून व्हाल हैराण

नवी दिल्ली : Black Sesame | शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) वाढल्याने हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. काही घरगुती उपायांनी सुद्धा बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. यासाठी काळेतील खुप उपयोगी आहेत. याचे पाणी लाभदायक ठरते. (Black Sesame)

काळे तीळ हे पाणी किंवा मधासोबतही खाऊ शकता. तसेच दह्यासोबतही खाऊ शकता. काळ्या तीळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

१. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करा :

हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, काळे तीळ सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या असेल तर याचे सेवन करू शकता. (Black Sesame)

२. लिव्हरसाठी फायदेशीर :

काळ्या तीळात अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात. याच्या सेवनाने लिव्हरच्या संसर्गाचा धोका कमी होतो. पचनक्रिया मजबूत होते.

३. वजन करते कमी :

काळ्या तीळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होते. लठ्ठपणाचा त्रास असेल, पोट सुटले असेल काळ्या तीळाचे पाणी प्या.

४. डायबिटीजवर लाभदायक :

काळेतीळ डायबिटीज रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. शुगरच्या आजारावर हा रामबाण उपाय आहे. काळेतीळ आणि लिंबू रोज सेवन करणे डायबिटीजसाठी वरदान ठरू शकते.

५. अँटिऑक्सिडंट्सचा सर्वोत्तम स्रोत :

काळ्या तीळामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ते अँटिऑक्सिडंट्सचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. याचे नियमित सेवन केल्याने हार्ट डिसीजचा धोका कमी होतो. हृदय निरोगी राहते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parking Regulations Revamped at Kokane Chowk in Pimple Saudagar to Enhance Traffic Flow