बहिणीला रस्त्यात अडवून केलं प्रपोज, समजावून सांगणार्‍या भावावर तरूणाकडून चाकूने वार, कोंढव्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बहिणीला रस्त्यात अडवून प्रपोज करणाऱ्याला तरुणाला समजावून सांगितल्यानंतर त्या तरुणाने भावावर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना कोंढव्यात ही घडली आहे.

याप्रकरणी असलम शेख याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असलम शेख याने सात ते आठ महिन्यांपूर्वी फिर्यादीच्या बहिणीला रस्त्यात अडवून प्रपोज केले होते. त्यामुळे जखमी तरुणाने शेख याला असे करू नको असे म्हणत त्याला समजावून सांगितले. याचा राग मनात धरून शेख याने चाकुने वार केले. त्याने कानाच्या मागे आणि मानेवर वार करत गंभीर जखमी केले आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.