नियमबाह्य पर्ससीन सामग्री असलेल्या नौका वरसोली बंदरात जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
पर्ससीन सामग्री नियमबाह्यरित्या बसविण्यात आलेल्या चार नौकांवर वरसोली बंदर ता.अलिबाग येथे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कारवाई करण्यात आली. या नौकेवरील पर्ससीन जाळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण 235 पितळी रिंग ताब्यात घेऊन स्थानिक नाखवा संघ वरसोली यांच्याकडे सुरक्षिततेच्या करणास्तव सुपूर्द करण्यात आल्या.

पकडण्यात आलेल्या नौका वरसोली बंदरात स्थानबद्ध करून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच नौका मालकाविरुद्ध खटले दाखल करण्यात येत आहेत. ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाखवा, परवाना अधिकारी पाटील, पोलीस दामिनी पथकातील कांबळे व पवार यांच्या पथकाने केली.