पडद्यावर पुन्हा दिसणार महेश भट आणि परवीन बॉबीची प्रेमकहाणी ! ‘हा’ अभिनेता बनणार ‘बॅडमॅन’

पोलिसनामा ऑनलाईन – प्रोड्युसर, डायरेक्टर महेश भट (Mahesh Bhatt) यांचं परवीन बॉबी (Parveen Babi) वर प्रेम होतं. परवीनच्या प्रेमाच्या नादात ते बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना भिडले होते. त्यांची पत्नी लॉरेन ब्राईट (किरण भट) ही देखील त्यांच्यापासून दूर झाली. त्यांनी यावर सिनेमाही बनवला होता. याचं नाव होतं अर्थ. आता अर्थ हा सिनेमा पुन्हा एकदा रिमेकमुळं चर्चेत आला आहे. अभिनेत्री शबाना आझमी यांनी या सिनेमात लिड रोल साकारला होता. त्यांनी सांगितलं की, त्यांचं या रिमेकशी काही देणं घेणं नाही.

शबाना यांनी स्पष्ट केलं आहे की, 1982 साली अर्थ या सुपरहिट सिनेमाच्या रिमेकशी त्यांचं काही देणंघेणं नाही. या सिनेमाचा रिमेक बनवणारे शरत चंद्र आणि अजय कपूर यांना असा दावा केला होता की, अर्थ सिनेमाच्या रिमेक साठी शबाना काही सूचना देणार आहेत. परंतु आता शबाना यांच्या वक्तव्यानंतर त्यांचा दावा मात्र खोटा ठरत आहे. निर्मात्यांनी या सिनेमाचा रिमेक बनवण्यासाठी मूळ सिनेमाचे निर्माते कुलजीत पाल यांच्याकडून राईट्स खरेदी केले आहेत आणि दिग्दर्शनाची जबाबदारी साऊथ इंडियन अ‍ॅक्ट्रेस रेवती यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

शरत चंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, रेवती शबाना आझमी यांच्या सोबत मिळून काम करेन. शबाना सुध्दा काही सूचना देतील. परंतु या सिनेमाशी काही संबंध नसल्याचं शबाना यांनी स्पष्ट केलं आहे. या रिमेकवर कोण काम करत आहे हेही त्यांना माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

निर्माते हा रिमेक महिलांच्या नाही तर पुरुषांच्या नजरेतून बनवणार आहेत. मूळ सिनेमात कुलभूषण खरबंदानं जी भूमिका साकारली होती ती भूमिका अभिनेता बॉबी देओल साकारणार आहे. निर्मात्यांनी यासाठी त्याची निवड केली आहे. त्याच्या सोबत बातचित सुरू आहे. परंतु अद्याप सिनेमा साईन झालेला नाही. दोन अभिनेत्रींची निवड अद्याप बाकी आहे.

बॉबीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो आश्रम (Aashram) या वेब सीरिजच्या दोन्ही सीजनमध्ये दिसला आहे. याचा पहिला सीजन प्रचंड गाजला होता. यानंतर याचा दुसरा सीजन आश्रम चॅप्टर 2 – द डार्क साईड (Aashram Chapter 2 – The Dark Side) 11 नोव्हेंबर 2020 रोजी (वार बुधवार) प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. डायरेक्टर प्रकाश झा (Prakash Jha) यांनी डायरेक्ट केलेली ही सीरिज एम एक्स प्लेअर (MX Player) वर रिलीज झाली होती.