लासलगाव रेल्वे स्थानकात आढळला मृतदेह, प्रचंड खळबळ

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील अमृत मेडिकलचे संचालक नानासाहेब रंगनाथ नाईकवाडी (वय ४५) यांचा ८ डिसेंबर रोजी लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ कोटमगाव शिवारातील पोल क्रमांक २३३/२४-२२ जवळ मृतदेह आढळून आला.

याबाबत लासलगाव येथील पोलीस कार्यालयात मंगळवारी (दि. ८) दुपारी गोरक्षनाथ जेऊघाले रेल्वे गँगमन यांनी खबर देऊन पोल क्रमांक २३३/२४-२२ च्या खडीचे गंजाजवळ येथील अमृत मेडिकलचे संचालक नानासाहेब रंगनाथ नाईकवाडी यांचा मृतदेह आढळून आल्याबाबत खबर दिली. त्यानंतर लासलगाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. रात्री थंडीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लासलगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास लासलगाव सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस देवीदास लाड करीत आहेत.