आता ‘डिओ’ला विसरा; ‘हा’ रस दूर करेल शरीराची दुर्गंधी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पावसाळा असो की उन्हाळा अनेकांच्या शरीराला दुर्गंधी येते. ही दुर्गंधी घालविण्यासाठी डिओ किंवा परफ्यूम वापरले जाते. परंतु, असे केमिकल्सयुक्त डिओ वापरण्या पेक्षा नैसर्गिक पदार्थ वापरून घरीच उपाय केले तर दुर्गाधीची समस्या दूर करता येते.

शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी लिंबाचा रस कॉटनच्या मदतीने शरीरावर लावावा. १० मिनिटांनंतर अंघोळ करावी. आणखी उपाय म्हणजे अ‍ॅपल साइड व्हिनेगर अंडर आम्र्समध्ये लावावे आणि दहा मिनिटांनंतर अंघोळ करावी. तसेच एक-एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून हे मिश्रण शरीरावर लावावे. पाच मिनिटांनंतर धुऊन घ्यावे. तसेच अंघोळीच्या पाण्यात टोमॅटोचा रस मिसळून अंघोळ केल्यास शरीराची दुर्गंधी नाहीशी होते. दोन चमचे तृणधान्याचा रस नियमित प्यायल्यासही दुर्गधी नष्ट होते. शिवाय अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तुरटी मिसळून अंघोळ केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.

अंघोळीच्या पाण्यात एक चमचा कापराचे तेल मिसळून आंघोळ केल्यास दुर्गंधी नाहीशी होते. तसेच एक चमचा मसूर डाळीची पावडर तीन चमचे लिंबाच्या रसामध्ये मिसळून पेस्ट बनवावी. हे मिश्रण शरीरावर लावल्यानंत. दहा मिनिटांनी अंघोळ करावी. या उपायाने शरीराची दुर्गंधी दूर होते. अर्धा चमचा चंदनाची पेस्ट अंडर आम्र्सवर लावून १० मिनिटांनंतर धुऊन घ्यावे. शलजम एक प्रकारचा कंद असून तो शरीरावर लावून पंधरा मिनिटांनंतर अंघोळ करावी. या उपयामुळे शरीराची दुर्गंधी दूर होते.