आमिर खानचा मुलगा जुनैद करतोय बॉलिवूड डेब्यू ! साऊथमधील ‘या’ सुपरस्टार अ‍ॅक्ट्रेस सोबत करणार ‘रोमांस’

बॉलिवूड स्टार आमिर खान (Aamir Khan) चा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी तयार आहे. आपल्या बॉलिवूड डेब्युमुळं सध्या तो चर्चेत आहे. जुनैद एका सुपरस्टार अ‍ॅक्ट्रेस सोबत करिअरला सुरुवात करणार आहे. ही अ‍ॅक्ट्रेस दुसरी तिसरी कोणी नसून साऊथ सुपरस्टार आणि अर्जुन रेड्डी (Arjun Reddy) या सुपरहिट सिनेमातील अ‍ॅक्ट्रेस शालिनी पांडे (Shalini Pandey) आहे. या सिनेमात तिनं विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सोबत काम केलं होतं. आता लवकरच जुनैद शालिनी सोबत काम करताना दिसणार आहे.

एका इंग्रजी रिपोर्टनुसार, जुनैद आपल्या डेब्यू सिनेमात शालिनी पांडे सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शालिनी पांडे देखील जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) या सिनेमातून रवीर सिंग (Ranveer Singh) सोबत बॉलिवूड डेब्यू करणार आहे. अशी माहिती आहे की, तिनं यशराज फिल्म्स सोबत तिनं 3 कॉन्ट्रॅक्स साईन केले आहेत. याशिवाय जुनैदचा डेब्यू सिनेमा हा तिचा दुसरा सिनेमा असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार राणी मुखर्जी (Rani Mukerji) स्टारर हिचकी (Hichki) सिनेमाचे डायरेक्टर सिद्धार्थ पी मल्होत्रा (Siddharth P. Malhotra) हेच जुनैदच्या डेब्यू सिनेमाचं डायरेक्शन करणार आहेत.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर अद्याप जुनैद आणि शालिनी यांच्या सिनेमाचं नाव फायनल झालेलं नाही. अशीही चर्चा आहे की, या सिनेमात जुनैद आणि शालिनी व्यतिरीक्त शर्वरी वाघ देखील दिसणार आहे. अशी माहिती आहे की, हा सिनेमा एक हिस्टॉरिकल ड्रामा असेल. तर काही लोक रोमँटीक ड्रामा असल्याचं सांगत आहेत. सिनेमाच्या स्टोरीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.