Birthday Special : बॉलिवूडमध्ये येण्यापुर्वी अभिषेक बच्चन होता LIC एजंट, 4 वर्षात दिलेले 17 फ्लॉप सिनेमे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आज (दि 5 फेब्रुवारी) आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेकचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत झाला. आज वाढदिवसानिमित्त अभिषेकवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. आज आपण वाढदिवसानिमित्त त्याच्या सिनेमाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. याशिवाय बॉलिवूडमध्ये येण्याआधी अभिषेक काय करायचा हे आपण जाणून घेणार आहोत.

अभिषेकनं 2000 साली आलेल्या रेफ्युजी या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. एक स्टार किड असल्यानं अभिषेकवर कामाचा एक प्रेशर होता. या सिनेमात त्याच्यासोबत करीना कपूर होती. हा सिनेमा खास काही चालला नाही. यानंतर अभिषेकला जे सिनेमे येते तो करत गेला. परंतु असं करणं त्याला महागात पडलं. अभिषेकनं 4 वर्षात सलग 17 फ्लॉप सिनेमे दिले. 2004 मध्ये त्यानं धूममध्ये काम केलं. हा सिनेमा सुपरहिट झाला. यानंतर त्यानं बंटी और बबली, युवा, ब्लफमास्टर, गुरु आणि दोस्ताना असे अनेक सुपरहिट सिनेमे दिले. यानंतर त्यानं सिद्ध केलं की, तो बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे.

अभिषेकनं बिग बी अमिताभ बच्चनची कोणतीही मदत न घेता बॉलिवूडमध्ये आपलं स्थान तयार केलं आहे. 20 वर्षांच्या त्याच्या करिअरच्या काळात अनेक चढ उतार त्यानं पाहिले आहेत. त्याचे बरेचसे सिनेमे फ्लॉप झाले. हैराण करणारी बाब अशी की सिनेमात काम न मिळाल्यावर अभिषेकनं LIC एजंटच्या कामातही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. पा या सिनेमात जेव्हा त्यानं पिता बिग बींच्या वडिलांची भूमिका त्यानं साकारली तेव्हा मात्र वर्ल्ड केलं होतं. यासाठी त्याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.