Advt.

Kriti Sanon Corona Positive : कृती सेननला ‘कोरोना’ची लागण ! राजकुमार रावसोबत करत होती शूटिंग

पोलीसनामा ऑनलाइन – अलीकडेच बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan), नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि डायरेक्टर राज मेहता (Raj Mehta) तसेच मनीष पॉल (Manish Paul) यांना कोरोनाची लागण झाल्याचं नुकतंच समोर आलं होतं. यानंतर आता अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) हिलाही कोरोना झाल्याचं समजत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कृती चंदीगढमध्ये शूटिंग करत होती.

एका इंग्रजी रिपोर्टनुसार, कृती सेननचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु अद्याप कृतीनं मात्र याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळं तिच्या हेल्थ अपडेटबद्दल नेमकी माहिती समोर आलेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार कृती सेनन अभिनेता राजकुमार राव सोबत चंदीगढमध्ये आपल्या अपकमिंग सिनेमाची शूटिंग करत होती. शेड्युल संपल्यानंतर तिनं इंस्टा स्टोरी फोटोही शेअर केला होता.

कृतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती मिमी या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उटेकर यानं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. अशी माहिती होती की, 20 डिसेंबर 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.