‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली …

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे ने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. लिसा रे तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. लिसा रेने सोशल मीडियावर मेकअपशिवाय तिचा फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ये मैं हूं 47 साल की, फ्री और बिना मेकअप के’ आपण जसे दिसता तसे स्वतःला पाहण्याची हिंमत करता का ? काही काळापूर्वी मी तिथेही नव्हते. प्रत्येकाला आपले महत्त्व माहित नसते, परंतु आपली त्वचा आणि त्याशी संबंधित कथा, आपले अनुभव, आपले सार जाणून घ्या आणि आपली योग्यता ओळखा आणि त्यावर प्रेम करा …’ ‘लिसा रेने या फोटो आणि पोस्टमधून महिलांना अशाच प्रकारे संदेश दिला.

लिसा रेच्या या फोटोवर चाहत्यांकडून बरीच कमेंट केली जात आहेत आणि तिच्या सौंदर्याचीही प्रशंसा केली जात आहे. लिसापूर्वी अभिनेत्री काजल अग्रवालनेही मेकअपविना तिचे फोटो पोस्ट केले होते, त्यानंतर चाहत्यांनीही तिच्या धाडसाचे कौतुक केले होते.

अभिनेत्री लिसा रेला सर्वाधिक लोकप्रियता नुसरत फतेह अली खानच्या गाण्यातील अफरीन अफरीनमधून मिळाली. लिसाने तिच्या फिल्मी करिअरची सुरूवात 2001 च्या ‘कसूर’ या चित्रपटाने केली होती. मात्र, आता तिचे लक्ष अभिनयापेक्षा अधिक लिखाणावर आहे. अलीकडेच लिसा रेचा पहिला स्मृतीपट ‘इन क्लोज टू द बोन’ प्रदर्शित झाला आहे. या पुस्तकात अभिनेत्रीने कर्करोगाचा पराभव करण्याची कथा लिहिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like