करिनापासून दिशापर्यंत सर्वच अभिनेत्री वापरतात ग्लोईंग स्किनसाठी ‘या’ सोप्या ब्युटी ट्रिक्स, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री यांचे काळेभोर केस आणि चमकदार त्वचा नेहमीच चर्चेचं कारण असत. त्या आपल्या सौंदर्याची आणि त्वचेची जीवापाड काळजी घेत असतात. प्रत्येक अभिनेत्रीचे वेगवगेळे ब्युटी गुपित आहेत. तुम्हाला कल्पनाही नाही पण अत्यंत सोप्या पद्धतीचा वापर करुन अभिनेत्री ग्लोईंग त्वचा मिळवतात. तर आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध सिने अभिनेत्रींच्या सौंदयाचे सिक्रेट्स सांगणार आहोत.

करिना – करिना कपूर खान आपल्या नैसर्गिक त्वचेसाठी ओळखली जाते. केसांना नियमित ऑलिव्ह ऑइल किंवा बदामाच्या तेलाने मालिश करते. विना मेकअप लूकमध्ये राहायला तिला आवडते. करिना आपल्या चमकदार त्वचेसाठी मधाचा वापर करते.

प्रियांका चोप्रा – आपल्या त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी प्रियंका खूप पाणी पिते. तिने एकदा सांगितलं होत की, प्रियंका आपल्या केसांची तेलाने मालिश करते. रात्रभर तेल तसेच ठेवून सकाळी धुवून टाकते. शूटिंग नसल्यास PeeCee मेकअपला टाळत असते. हेल्दी त्वचेसाठी दह्याच्या फेसपॅकचा वापर करते.

कतरिना – कतरिनाला आपल्या त्वचेवर मेकअप करण्यास आवडत नाही. सनस्क्रीन लोशन आणि लिपबाम लावते. त्याशिवाय तिला लांब केस खूप आवडतात. केसांना सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करण्यापेक्षा नॅचरल केस सुकवणे तिला आवडत.

ऐश्वर्या – जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये ऐश्वर्या राय बच्चन ची गणना केली जाते. आपल्या त्वचेस फ्लॉलेस ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या सामानाचा वापर करते. चण्याच्या पिठात मध आणि दही घालून या पॅकचा उपयोग करते. आठवड्यातून एकदा आपल्या केसांना तेल लावत असून चेहऱ्यासाठी काकडीच्या फेस पॅकचा वापर करते.

आलिया भट्ट – विना मेकअप जितकी सुंदर दिसते तितकीच आलीय मेकअप मध्ये सुंदर दिसते. आपल्या त्वचेला सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी आलिया मुलतानी मातीचा वापर करते. या फेसपॅक च्या माध्यमातून त्वचेवर येणार तेल नियंत्रणात ठेवलं जात. यामुळे त्वचेवर एक्ने, डाग पुळ्या उद्भवत नाही.

दिशा पटानी – आपल्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी दिशा आठवड्यातून दोन वेळा तेल लावते. कांद्याचे तेल दिशा केसांना लावते. त्यामुळे केसांना पोषण मिळते.

दीपिका पादुकोण – मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या त्वचेस हायड्रेट ठेवण्यासाठी दीपिका दिवसभर जास्त पाणी पिते. जंक फूडपासून ती लांबच राहते. आपल्या त्वचेस रिफ्रेश करण्यासाठी स्पा ला जाते. तसेच सनस्क्रिन लोशनचाही वापर करते.