‘क्रिकेटर्स’नंतर आता बॉलिवूड अभिनेत्रींच्या Male व्हर्जनची सोशलवर जोरदार चर्चा, लुक पाहून ‘हैराण’ व्हाल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियातील क्रिकेटरच्या फीमेल व्हर्जननं सोशल मीडियावर खूप अटेंसन घेतलं ज्यात सर्व खेळाडू स्त्रीच्या वेशात दिसत होते. यानंतर आता बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसच्या मेल व्हर्जनची चर्चा सुरू आहे. यात अ‍ॅक्ट्रेसला दाढी, मिशा आणि लहान केस दिसत आहेत. म्हणजेच सर्व अ‍ॅक्ट्रेस पुरुषाच्या लुकमध्ये दिसत आहेत.

ज्या अ‍ॅक्ट्रेस मेल व्हर्जनमध्ये दिसत आहेत त्यात दीपिका पादुकोण, प्रियंका चोपडा, आलिया भट, सोनम कपूर, कंगना रणौत, कृती सेनन, यामी गौतम, दिशा, पाटनी, ऐश्वर्या राय, जॅकलीन फर्नांडिस, कियारा आडवाणी, श्रद्धा कपूर, प्राची देसाई, तापसी पन्नू, अनन्या पांडे, परिणिती चोपडा, भूमी पेडणेकर, उर्वशी रौतेला या अभिनेत्रींचा समावेश आहे.

सध्या अभिनेत्रींच्या मेल व्हर्जनच्या या लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं तर खूप मजेदार कमेंट केलीय. एक युजर म्हणतो, जेव्हा कोणी असं म्हणतं की, ही तिच्या वडिलांवर गेली आहे.”

बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसच्या मेल व्हर्जनला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. सध्या अभिनेत्रींचे या लुकमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.