‘बच्चन पांडे’चं नवीन पोस्ट शेअर करत ‘खिलाडी’ अक्षय सांगितली रिलीज डेट ! दिसला जबरदस्त लुक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) नं त्याचा आगामी सिनेमा बच्चन पांडे ची घोषणा केली आहे. त्याचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं म्हणजे 26 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाची घोषणा करताना अक्षयनं एक जबरदस्त पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अक्षय खूपच वेगळा आणि डेंजरस लुक दिसत आहे. या नव्या पोस्टरनं आता चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढवली आहे.

अक्षयनं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. हे बच्चन पांडे सिनेमाचं पोस्टर आहे. पोस्टर शेअर करताना त्यानं लिहिलं की, याचा एक लुकच पुरेसा आहे. बच्चन पांडे 26 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणार आहे.

लुकबद्दल बोलायचं झालं तर अक्षय खूपच डेंजर दिसत आहे. त्याचा एक डोळा नकली दिसत आहे. सोबत त्यानं मजबूत आणि जड साखळ्याही गळ्यात घातल्या आहेत. अक्षय एका जबरदस्त गँगस्टर सारखाच दिसत आहे.

अक्षयचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाल्याचं सांगितलं आहे.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar), कृती सेनन (Kriti Sanon), अरशद वारसी (Arshad Warsi) असे काही कलाकार काम करताना दिसणार आहे. अक्षयनं यात बच्चन पांडेची भूमिका साकारली आहे जो एक गँगस्टर आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच तो लक्ष्मी सिनेमात दिसला आहे. यानंतर आता तो पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे, बच्चन पांडे, रक्षाबंधन अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे. त्याच्याकडे राम सेतु हाही सिनेमा आहे.