‘खिलाडी’ अक्षयच्या ‘बेल बॉटम’च्या रिलीज डेटमध्ये बदल ! ‘या’ दिवशी होणार रिलीज, जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) लवकरच स्पाय थ्रिलर बेल बॉटम (Bell Bottom) सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात त्याच्या सोबत अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) काम करताना दिसणार आहे. अक्षयसोबतचा वाणीचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. आधी मेकर्सनं ठरवलं होतं की, हा सिनेमा 2 एप्रिल 2021 रोजी गुड फ्रायडेवाल्या विकेंडला रिलीज करतील. परंतु आता जी माहिती समोर आली आहे त्यावरून असं समजत आहे की, या सिनेमाची रिलीज डेट आता टाळण्यात आली आहे.

एका वृत्तानुसार, बेल बॉटमची रिलीज मेकर्सनं पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाशी संबंधित सूत्रांनी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, सिनेमाच्या मेकर्सनी सिनेमाची रिलीज डेट 2 महिन्यांनी वाढवून जून केली आहे. याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे अक्षयच्या सूर्यवंशी सिनेमाची रिलीजची वेळ. सूर्यवंशीच्या मेकर्सनी असं ठवरलं आहे की, ते 15 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान सिनेमा रिलीज करतील. त्यामुळं कोरोना महामारीच्या काळात एकाच महिन्यात दोन सिनेमे रिलीज करणं मुर्खपणाचं ठरू शकतं.

1980 च्या दशकातील कहाणी
सत्य घटनांपासून प्रेरीत बेल बॉटम हा सिनेमा 1980 च्या दशकातील कहाणीवर आधारीत सिनेमा आहे. भारताकडून विसर पडलेल्या काही नायकांना यात दाखवण्यात आलं आहे. रंजीत एम तिवारींनी सिनेमा डायरेक्ट केला आहे. असेम अरोरा आणि परवेज शेखनं हा सिनेमा लिहला आहे.

सिनेमाबद्दल बोलयाचं झालं तर या सिनेमा अक्षय आणि वाणी यांच्या व्यतिरीक्त लारा दत्ता ही देखील झळकणार आहे. वाणीनं सिनेमात अक्षयच्या पत्नीचा रोल साकरला आहे. 1980 च्या काळातील भारताच्या पंतप्रधानांचा रोल लारानं साकारला आहे.