‘खिलाडी’ अक्षयच्या Laxmii नं रिलीज होताच रचला इतिहास ! नावावर केला ‘हा’ रेकॉर्ड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी (Laxmii) हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 9 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. कंचना (Kanchana) या मूळ तमिळ सिनेमाचा तो रिमेक आहे. लक्ष्मी सिनेमानं रिलीज होताच इतिहास रचला आहे. एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney+ Hotstar) रिलीज होणारा सर्वांत मोठा ओपनिंग सिनेमा म्हणून हा सिनेमा समोर आला आहे.

रिलीजच्या काही तासांतच बनवलं रेकॉर्ड
रिलीज झाल्याच्या काही तासांतच लक्ष्मी सिनेमानं हे रेकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे. या सिनेमात अक्षय कुमारनं पहिल्यांदाच ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी लोकांनी पहिल्या दिवशीच लॉगईन केलं आहे आणि या सिनेमाला या प्लॅटफॉर्मवर सर्वांत जास्त पाहिला जाणारा सिनेमा बनवलं आहे.

अक्षयनं व्यक्त केला आनंद
यावर आपला आनंद व्यक्त करत अक्षय कुमार म्हणाला, “लक्ष्मीला मिळालेला प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे. देशभरातील अनेकांनी हा सिनेमा पाहण्यासाठी लॉगईन केलं. बीटिंग रेकॉर्ड कोणाला आवडत नाहीत, मग तो बॉक्स ऑफिसवर असोत किंवा मग स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ओपनिंग नाईट असो.”

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. नुकताच तो लक्ष्मी सिनेमात दिसला आहे. यानंतर आता तो पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे.