COVID-19 : डायरेक्टर अनुराग कश्यप करतोय ‘फिल्मफेअर’च्या ट्रॉफीचा ‘लिलाव’, जमा झालेल्या फंडातून खरेदी करणार कोरोना व्हायरस टेस्ट किट्स !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   COVID-19 : डायरेक्टर अनुराग कश्यप करतोय ‘फिल्मफेअर’च्या ट्रॉफीचा ‘लिलाव’, जमा झालेल्या फंडातून खरेदी करणार कोरोना व्हायरस टेस्ट किट्स !

भारतात रोजच कोरोनाची प्रकरणं समोर येत आहेत. अशात देशात चौथ्यांदा लॉकडाऊन लागू झाला आहे. सर्वजण कोरोना वॉरियर्स आणि गरीबांना मदत करत आहेत. बॉलिवूड डायेक्टर अनुराग कश्यप कॉविड-19 टेस्टची सोय करण्यासाठी फंड एकत्र करत आहे.

अनुराग कश्यप त्याच्या ट्रॉफीजचा लिलाव करणार आहे. ट्विटरवरून अनुरागनं याबाबत घोषणा केली आहे. अनुरागनं सांगितलं की, जो जास्त बोली लावेल त्याला फिल्मफेअरची ट्रॉफी दिली जाईल. अनुरागला ही ट्रॉफी त्याचा सिनेमा गँग्स ऑफ वासेपूरसाठी मिळाली होती.

अनुरागसोबतच कॉमेडीयन कुणाल कामरा आणि वरुण ग्रोवर हेदेखील त्यांचं युट्युब बटन आणि ट्रॉफी यांचा लिलाव करणार आहेत. पुढील 30 दिवसांत त्यांना 13,44,000 रुपयांचा फंड जमवायचा आहे. या फंडातून ते लोकांसाठी किट्स खरेदी करणार आहे ज्याच्या मदतीनं कोरोना टेस्ट करता येईल.

वरुण ग्रोवरनं ट्रॉफीचा फोटो शेअर केला आहे जी त्याला मोह मोह के धागेसाठी मिळाली होती. वरुण म्हटला आहे की, सध्या भारताला वाचवण्याची वेळ आहे. म्हणूनच ट्रॉफीचा वापर फंड जमवायला करणार आहे.