Video : लवकरच येणार ‘अपने’ सिनेमाचा सीक्वल, ‘हीमॅन’ धर्मेंद्र यांनी केली घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी चर्चित सिनेमा अपने (APNE) चा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द धर्मेंद्र यांनीच याबाबत घोषणा केली आहे. हीमॅन धर्मेंद्र यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

धर्मेंद्र यांनी रविवारी (दि. 29 नोव्हेंबर) हिट सिनेमा अपनेचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. अपने या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांची दोन मुलं अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. गदर एक प्रेम कथा सिनेमाचे डायरेक्टर अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला होता. यात एका बॉक्सरची स्टोरी दाखवण्यात आली होती.

धर्मेंद्र (84) यांनी जुन्या सिनेमातील एक क्लिप ट्विटरवरून शेअर केली आहे. यासोबत त्यांनी लिहिलं की, देवाच्या कृपेनं आणि तुमच्या प्रार्थनांनी आम्ही तुमच्यासाठी अपने 2 बनवण्याचा निर्णय घेतला आहे. असं सांगितलं जात आहे की, अपने 2 पुढील वर्षी पडद्यावर पाहिला जाऊ शकतो.

अपने या सिनेमात धर्मेंद्र आणि देओल बंधू यांच्याव्यतिरिक्त कॅटरीना कैफ, शिल्पा शेट्टी आणि किरण खेर यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

धर्मेंद्र यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी फूल और पत्थर, अनुपमा, सीता और गीता, शोले अशा अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. पद्म भूषण विजेता या अभिनेत्यानं घायल आणि यमला पगला दीवाना 2 यांसारखे सिनेमे प्रोड्युस केले आहेत. आता त्यांचा अपने 2 सिनेमा लवकरच येणार आहेत.

You might also like