Photos : अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी Bold अवतारामुळं पुन्हा एकदा चर्चेत ! दाखवला ‘तिथला’ Tattoo

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    बॉलिवूड स्टार अरबाज खान (Arbaaz Khan) ची गर्लफ्रेंड आणि इटालियन मॉडेल व बॉलिवूड अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) ही आपल्या हॉट फिगर, फिटनेस आणि फोटोंमुळं कायमच चर्चेत येत असते. आपल्या काही बोल्ड फोटोंमुळं जॉर्जिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

जॉर्जियानं तिच्या इन्स्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत जॉर्जिया खूपच स्टनिंग आणि बोल्ड दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनीही यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांना तिचा हा अवतार खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या ब्यूटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

जॉर्जियानं शॉर्ट ड्रेसमधील तिच्या मांडीवरला टॅटूही फ्लाँट केला आहे. काहींनी तिच्या टॅटूचंही कौतुक केलं आहे. काही तासात तिच्या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत.

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज खान जॉर्जियाला डेट करत आहे. दोघंही अनेकदा क्वाॅलिटी टाईम स्पेंड करताना दिसतात. अनेकदा दोघांच्या लग्नाच्या चर्चाही होताना दिसत असतात.

जॉर्जियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच वेलकम टू बजरंगपूर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यात श्रेयस तळपदे, संजय मिश्रा आणि तिग्मांशू धुलिया प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय ती अरबाज खान आणि प्रिया प्रकाश वॉरियर अभिनित बहुप्रतीक्षित श्रदेवी बंगलोमध्ये आयटम नंबर करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CGZwPaGl9us/

https://www.instagram.com/p/CDy9r0zlHj-/

https://www.instagram.com/p/CC_fDJ1FzMN/

https://www.instagram.com/p/CA5QDSnFf6u/