Rosie साठी अरबाज खान अन् विवेक ओबेरॉयनं मिळवला हात ! नेमकं प्रकरण काय ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांच्यातील वाद साऱ्यांनाच माहीत आहे. दोघं एकमेकांसोबत बोलतही नाहीत. परंतु अशातच आता अशी माहिती आहे की, अरबाज खान (Arbaaz Khan) नं आपला भाऊ सलमान खानची दुश्मनी विसरत विवेक ओबेरॉय सोबत हात मिळवला आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, अरबाज खान आणि विवेक ओबेरॉय रोजी : द सॅफरन चॅप्टर (Rosie: The Saffron Chapter) नावाच्या हॉरर सिनेमात एकत्र काम करणार आहेत. विवेक ओबेरॉय स्वत:च याची निर्मिती करत आहे. याशिवाय तोच या सिनेमात लिड रोल साकारणार आहे.

रोजी : द सॅफरन चॅप्टर एक रिअल लाईफ स्टोरीवर आधारीत सिनेमा आहे. यात अ‍ॅक्ट्रेस श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) प्रमुख भूमिका साकारणार आहे. खास बात अशी आहे की, हा पलकचा डेब्यू सिनेमा आहे. पलक या सिनेमात रोजी नावाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

मेकर्सनं सोशलवर याचा फर्स्ट लुक व्हिडिओ शेअर केला आहे. सिनेमाचं पोस्टर खूप इंटरेस्टिंग आहे. रोजी : द सॅफरन चॅप्टर 2003 साली घडलेल्या खऱ्या घटनेवर आधारीत आहे.

You might also like