NCB च्या कार्यालयात पोहाेचताच कॅमेऱ्यांनी चहुबाजूंनी घेरली गेली अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड !

पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमध्ये ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर नारकोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आता याचा तपास करत आहे. याचं बॉलिवूड कनेक्शन समोर आल्यानंतर यात अनेक मोठ्या नावांचा खुलासा झाला होता. आता या प्रकरणी चौकशीसाठी बुधवारी अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades) ही एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली.

गॅब्रिएला कार्यालयात पोहोचताच मीडियाच्या कॅमेऱ्यांनी तिला चहुबाजूंनी घेरलं. यावेळी तिचा चेहरा अजिबात दिसत नव्हता. कारण तिनं चेहऱ्यावर मास्क लावला होता आणि केसही मोकळे सोडले होते.

गॅब्रिएला येण्याच्या आधीच मीडिया एनसीबीच्या कार्यालयाबाहेर हजर होती. यावेळी गॅब्रिएला आपल्या कारमधून उतरल्यानंतर थेट कार्यालयात गेली. यावेळी तिनं कुणाच्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन रामपालच्या घरी बॅन केलेले मेडिसिन सापडले आहेत. हे NDPS अ‍ॅक्टमध्ये येतात. यामुळंच त्याची पार्टनर गॅब्रिएलाची चौकशी होत आहे. अर्जुन रामपाल यालाही 12 नोव्हेंबरला चौकशीसाठी एनसीबी समोर हजर व्हायचं आहे.

बॉलिवूड स्टार अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स नेहमीच चर्चेत असतात.